मुंबई - भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे बदनामी झाली' असे विधान करत मानहानीचा खटला संजय राऊत यांनी शिवडी मुंबई न्यायालयात दाखल केला आहे. त्याची सुनावणी ४ जुलै रोजी होणार आहे. संजय राऊत यांना ट्विट् करून अज्ञात व्यक्तींनी धमकी दिल्याचे प्रकरण शमत नाही. तोपर्यंत पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या संदर्भात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी कुटुंब आणि एकूण संजय राऊत यांच्या संदर्भात मानहानिकारक वक्तव्य केले आहे. अशा अर्थाची याचिका संजय राऊत यांनी मुंबईच्या शिवडी न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे.
आता राणे यांच्याविरुद्ध संजय राऊत - संजय राऊत रोज सकाळी प्रसारमाध्यमासमोर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि राष्ट्रीय तसेच राज्याच्या राजकारणाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षावर ते सडकून टीका करतात. त्यालाच प्रतिवाद करण्यासाठी म्हणून भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील रोज पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर राजकीय आणि इतर वैयक्तिक पद्धतीची टीका करत हल्लाबोल सुरू केला होता. त्या अनुषंगाने संजय राऊत त्यांनी म्हटले आहे की, राजकीय टीका करणे हे वेगळे परंतु वैयक्तिक आणि कुटुंबाच्या संदर्भात मते व्यक्त करून बदनामी केलेली आहे.
खासगी आयुष्याबाबत बदनामीकारक विधान - संजय राऊत यांचे वाकिल विक्रांत साबणे यांनी ईटीव्ही भारतकडे प्रतिक्रिया व्यक्त केली की, संजय राऊत यांच्या संदर्भात आमदार नितेश राणे जे भाजपा पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी जे विधान राऊत यांच्या बाबत केले आहे, त्यात संजय राऊत यांच्या कुटुंबा बाबत तसेच त्यांच्या खासगी आयुष्याबाबत ते विधान आहे. त्यामुळेच ते बदनामी करणारे असे विविध 15 प्रकारचे मुद्दे आहेत. अश्या सर्व मानहानी वक्तव्याबाबत बदनामी संदर्भात कायदा 2005 अंतर्गत खटला शिवडी न्यायालयात दाखल आहे. पुढील काही दिवसात त्याची सुनावणी अपेक्षित आहे.
संजय राऊत यांच्या जोरदार पत्रकार परिषदांचा रतिब - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जवळ-जवळ रोजच सकाळी पत्रकार परिषदा होत असतात. त्यामध्ये ते एक-एक मुद्दा घेऊन विरोधकांवर सडकून टीका करतात. त्याचा समाचार घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते प्रति पत्रकार परिषद घेत असतात. त्यामध्ये नितेश राणे आघाडीवर असतात. त्यातूनच त्यांनी केलेली काही वक्तव्ये खटकल्याने आता हे प्रकरण न्यायलयात पोहोचले आहे.
हेही वाचा...
- Nitesh Rane : मी फक्त म्याऊ म्याऊ केले तरी त्यांना घाम फुटतो; संजय राऊतांच्या टीकेला नितेश राणेंचे उत्तर
- Sanjay Raut on Amit Shah: कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून अमित शाह यांचे फक्त निवडणुकांवर लक्ष-संजय राऊत
- Amit Shah Vs Uddhav Thackeray : प्रश्नांची उत्तरे द्या, अन्यथा होईल पर्दाफाश, अमित शाह यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान