मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेस पक्षातील बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर टीका करण्यात आली आहे. यावर खासदार संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्व मंत्र्यांसोबत चांगले संबध आहेत. ज्यांना मुख्यमंत्र्यांना भेटायचे आहे त्यांनी भेटावे, ते सर्वांचे प्रश्न मार्गी लावतील. महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही ठीक आहे.
काँग्रेसमधील काही मंत्री, विशेषतः अशोक चव्हाणांची तक्रार आहे की, प्रशासनातील अधिकारी त्यांचे काहीच ऐकत नाही. जे बोलायचे आहे, ते मुख्यमंत्र्यांनाच बोलणार. त्यामुळे त्यांनी खुशाल चर्चा करावी त्यांच्या सर्व प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडे नक्कीच समाधानकारक उत्तरे असतील. चर्चेनंतर सर्व शंका दूर होतील. महाविकास आघाडीतील कोणीच मंत्रीपदावरून नाराज नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार नाही, असेही ते म्हणाले.
सामनाच्या अग्रलेखात नेमके काय म्हटले आहे वाचा - खाट का कुरकुरतेय?, मंत्री चव्हाण अन थोरातांवर सामनातून 'तिरकस बाण'