ETV Bharat / state

Sanjay Raut News : 2024 ला पोलिसांचा हिशेब केला जाईल- अद्वय हिरे अटक प्रकरणावरून संजय राऊत यांचा इशारा

Sanjay Raut : अद्वय हिरे यांची अटक पूर्णपणे राजकीय दबावतंत्राचा भाग आहे. अद्वय हिरे यांच्यावरील आरोप आधीही होते. तेव्हा ते भाजपामध्ये होते. मात्र, ते शिवसेनेत आले. त्यांना घाबरून मंत्रीमहोदयांनी शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून षडयंत्र केलं, असा घणाघाती आरोप संजय राऊतांनी केलाय.

Sanjay Raut
Sanjay Raut
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 2:23 PM IST

संजय राऊत, खासदार

मुंबई Sanjay Raut News : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी बुधवारी भोपाळ येथून फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली. अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यामुळं अद्वय हिरे यांच्या अटकेनंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट दादा भुसे यांच्यावर आरोप केले आहेत.

काय म्हणाले खासदार संजय राऊत : अद्वय हिरे यांच्या अटकेबाबत मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, राजकीय दबावतंत्रानं हिरे यांना अटक करण्यात आलीय. त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. पण खरं म्हणजे हे आरोप त्यांच्यावर भाजपमध्ये असतानाही होते. मालेगाव विधानसभेत त्यांनी सभा घेतली. त्यामुळं मंत्री महोदय दादा भुसे यांनी त्यांच्या कुटूंबियांविरोधात 40 पेक्षा जास्त गुन्हे दाखल केले. त्यांच्यावर निव्वळ दबाव आणण्यासाठी ही अटक करण्यात आलीय, असं म्हणत राऊतांनी हिरेंच्या अटकेवरून हल्लाबोल केलाय.

2024 ला पोलिसांचा हिशोब केला जाईल : पुढं बोलताना राऊत म्हणाले की, "दादा भूसे यांच्यावरही गिरणा सहकारी साखर कारखान्यात घेटाळा केल्याचा आरोप आहे. आम्ही रितसर तक्रार केलीय. राहूल कूल यांच्यावर काय कारवाई झाली? भिमा पाटस सहाकरी कारखान्यात मनी लाॅंड्रींग आहे. 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला. हे आरोप स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तेच अजित पवार आज गृहमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. हसन मुश्रीफ यांनी संताजी घेरपडे साखर कारखान्यात घोटाळा केला. ते बाहेर सुटले.

अद्वैय हिरेंना मालेगावमध्ये विधानसभा लढवू नका, यासाठी त्रास दिला जात होता. नाशिक ग्रामिण पोलिसांनी जी कारवाई केली त्याची नोंद आम्ही घेतलीय. मालेगावत कोणत्या राजकिय नेत्याच्या घरात ललीत पाटिल ड्रग्ज प्रकरणातील पैसा जात होता, त्याची माहीती आम्हाला आहे. 2024 ला पोलिसांचा हिशेब केला जाईल-खासदार संजय राऊत

अद्वय हिरेंना भोपाळमधून अटक : या प्रकरणात मिळालेल्या माहितनुसार, अद्वय हिरे यांनी नाशिक जिल्ह्यातील रेणुका मिलमधून सात कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं. हिरे यांच्याविरुद्ध मालेगाव येथील रमजानपुरा पोलिस ठाण्यात एप्रिल महिन्यात थकीत कर्ज न भरणे व बँकेची दिशाभूल करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी अध्याय हिरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, हायकोर्टाने हिरे यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आणि हिरे यांची याचिका फेटाळण्यात आली.

हेही वाचा :

  1. Advay Hire Arrest News : ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंना भोपाळमधून अटक, नेमकं प्रकरण काय?
  2. Sanjay Raut vs Nitesh Rane : नितेश राणे-संजय राऊत टीका करताना 'कमरेखाली' घसरले, काढली एकमेकांची 'अंतर्वस्त्र'
  3. Sanjay Raut on EC : शिवसेना कुणाची? पाकिस्तानला माहिती, पण निवडणूक आयोगाला नाही-संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.