ETV Bharat / state

Sanjay Raut : रणशिंग फुंकले! ईडी सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही; संजय राऊत यांचे भाकित

author img

By

Published : Dec 17, 2022, 5:36 PM IST

महाविकास आघाडीकडून महामोर्चा ( Crowd at Mahavikas Aghadi Mahamorcha ) काढण्यात आला. महापुरुषांच्याविरोधात बोलणाऱ्यांवर राऊत यांनी जोरदार हल्लाबोल ( Sanjay Raut Criticize Shinde Fadanavis Government ) केला. मोठ्या प्रमाणात महामोर्चाला गर्दी झाली होती.

Sanjay Raut
संजय राऊत

मुंबई : महापुरुषांच्याविरोधात होणाऱ्या विधानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महामोर्चा ( Crowd at Mahavikas Aghadi Mahamorcha ) काढला. या मोर्चाच्या माध्यमातून आता रणनीती ठरली आहे. रणशिंग आणि शंखही फुंकला आहे. आता ही फौज युद्धासाठी सज्ज झाली आहे. राज्यपालांना डिसमिस करणारा हा मोर्चा असून ईडी सरकार फेब्रुवारी महिन्यापर्यंत सत्तेत राहणार नाही. असा सूचक इशारा शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut Criticize Shinde Fadanavis Government ) यांनी दिला. राऊत यांनी महामोर्चाला संबोधित करताना शिंदे - फडणवीस सरकार आणि राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला.

महामोर्चाला गर्दी : महाविकास आघाडीच्या महामोर्चाला गर्दी झाली होती. या मोर्चात राज्याच्या कनाकोपऱ्यातून लोक आले होते. विशेष म्हणजे भाजप, मनसे आणि शिंदे गट वगळता सर्वच पक्षाचे लोक या मोर्चाला उपस्थित होते. महाविकास आघाडीचा मोर्चा हा राज्यपालांना डिसमिस करणारा आहे. आता लढाईची सुरुवात ज्या पद्धतीने केली आहे. त्यामुळे सरकार हतबल झाले आहे. महाराष्ट्र एक झाला आहे सांगण्यासाठीच आपण एकत्रं आलो आहोत. असं सांगतानाच आपली आजची विराट शक्ती ही फक्त विराट शक्ती नाही, तर सरकार उलथवून लावण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल आहे. शिंदे - फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणारा नाही, असा इशारा राऊत यांनी दिला. शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका ( Sanjay Raut Warning Maharashtra Government ) केली.

महापुरुषांचा अपमान : महापुरुषांचा अपमान करून कोणी सत्तेत बसू शकेल का? यांना एक मिनिट सुद्धा सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. हे सरकार उलथवून टाकण्याचा हा दिलेला हा इशारा आहे. आज दिल्लीही दुर्बिणीतून पाहत असेल महाराष्ट्राची ताकद काय आहे. महाराष्ट्र आज जागा झाला आहे. महाराष्ट्र पेटलाय, ही ठिणगी पडली आहे. त्यामुळे या व्यासपीठावर महाराष्ट्रातील प्रत्येक नेता आहे अन् महापुरुषांचा अपमान करणारे मंत्रालयात बसले आहेत. हा सर्वात मोठा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे सरकार उलथवून टाकण्याची संधी हे टाकलेले पाऊल आहे. महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनता एकत्र आली असून महाराष्ट्राचा रंग अवघा एक झाला आहे. त्यामुळे समोरील रावण जाळण्यासाठी सज्ज झालो आहोत. या मोर्चाच्या माध्यमातून आता रणनीती ठरली. रणशिंग फुंकले आहे आणि शंखही फुंकला आहे. आता ही फौज युद्धासाठी सज्ज झाली आहे. वज्रमुठ वळली असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून वादग्रस्त विधाने : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने वादग्रस्त विधाने करण्यात ( Karnataka CM Controversial statements ) आले. आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावर साधा शब्द उच्चारला नाही. तुम्हाला जमत नसेल तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला आमच्या ताब्यात द्या, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. शिवसैनिकांनी यानंतर एकच जल्लोष करत शिंदे - फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.