मुंबई: 'इंडिया' आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट १ सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकारला खाली खेचण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत. तरीसुद्धा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा विजय प्राप्त करण्यासाठी भाजपाकडून काहीही केलं जाऊ शकतं, असा संशय ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. याचा दाखला देत राम मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी हल्ला केला जाण्याची भीती संजय राऊत यांनी व्यक्त केलीय. खासदार राऊत हे त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी बोलत होते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी... संजय राऊत म्हणाले की, राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ट्रेन भरभरून लोक येणार आहेत. ज्या पद्धतीने पुलावामा घडलं, त्या पद्धतीने एखादा हल्ला या ट्रेनवर होऊ शकतो. दगडफेक होऊ शकते, आगीचे गोळे फेकले जाऊ शकतात, अशी भीती 'इंडिया' आघाडीच्या प्रमुख नेत्यांना आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा आणि गुजरात गोध्रा हत्याकांड झालं, तसं काहीही घडवून आणलं जाऊ शकतं, अशी शंकाही या नेत्यांना असल्याचं राऊत म्हणाले आहेत.
-
लोकशाही वाचवण्यासाठी आता पुन्हा लढायची वेळ आलीय! pic.twitter.com/r7uduTYXMI
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">लोकशाही वाचवण्यासाठी आता पुन्हा लढायची वेळ आलीय! pic.twitter.com/r7uduTYXMI
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 29, 2023लोकशाही वाचवण्यासाठी आता पुन्हा लढायची वेळ आलीय! pic.twitter.com/r7uduTYXMI
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 29, 2023
शिवसेनेला लोकसभेच्या कमीत कमी १९ जागा- 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत कुठल्याही पद्धतीने जागा वाटपाची चर्चा होणार नाही. या बैठकीत देशातील इतर ज्वलंत विषयांवर चर्चा होणार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच २०१९ मध्ये आमचे १८ खासदार व दादरा नगर हवेलीमध्ये १ असे १९ खासदार होते. त्याच पद्धतीने यंदा तो आकडा १९ चा २० वर जाईल. परंतु त्यापेक्षा कमी होणार नाही. संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना लोकसभेच्या कमीत कमी १९ जागा लढवेल, असं सांगितलं आहे. या बैठकीबाबत ३० ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता उद्धव ठाकरे, शरद पवार, अशोक चव्हाण, नाना पटोले हे सर्व प्रमुख नेता महत्त्वाची बैठक करणार आहेत. तेव्हा याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल, असंही राऊत म्हणाले आहेत.
नितीन गडकरी सक्षम नेते- कॅगच्या अहवालातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे का? या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, नितीन गडकरी हे फार महत्त्वाचे आणि कार्यक्षम मंत्री आहेत. सध्या देशात फक्त त्यांचंच काम दिसतंय. भविष्यात देशाचं नेतृत्व करण्याची ताकद त्यांच्यात आहे. परंतु जर कोण-कोणाच्या वाटेला आडवं येत असेल तर त्याला कसं संपवायचं, हे त्यांना चांगलं ठाऊक आहे, असं सांगत राऊत यांनी एक प्रकारे मोदींवर निशाणा साधला आहे.
लडाखमध्ये चीननं शिरकाव केलाय, असं राहुल गांधी सत्यच बोलत आहेत. तसंच तुम्ही किती आग्रह धरला तरी २०२४ ला हे सरकार बदलणार आहे. आमचं सरकार येणार आहे- ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत
कार सेवकांना श्रेय- बाबरी आणि अयोध्येच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले आहेत की, हा मुद्दा आता संपलेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं याबाबत निर्णय दिल्यानंतर हा विषय पूर्णतः संपलेला आहे. याचे श्रेय जर कोणाला द्यायचे असेल तर ते कार सेवकांना दिले गेले पाहिजे. जे कारसेवक मारले गेले आहेत, जे हुतात्मा झाले आहेत, त्यांना याचं श्रेय द्यायला हवं. याच्यामध्ये शिवसेनेचाही सहभाग होता असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
हेही वाचा-