मुंबई : 12 जानेवारीला धनुष्यबाण कुणाला मिळणार? ठाकरेंना की शिंदेंना याची सुनावणी दिल्लीत निवडणूक आयोगासमोर होणार आहे. सोबतच राज्यपालांची देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानाची मालिका सुरुच आहे. तर, दुसरीकडे आजच्या दैनिक सामानातील रोखठोक औरंगजेबाचे गुजरात कनेक्शन सांगण्यात आले आहे. या सर्व विषयांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद ( Sanjay Raut Abusive Language for Maharashtra Minister ) साधला.
रामशास्त्री बाण्याचे न्यायमूर्ती अजूनही आहेत : यावेळी बोलताना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut Abusive Language ) म्हणाले की, "निवडणूक आयोगाच्या सगळ्या नेमणुका सरकार करते. या सर्व नेमणुका सरकारच्या मर्जीने झालेल्या असतात. तरीही आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवतो. नीपक्षपाती निर्णय घेतले जातील अशी आम्हाला आशा आहे. निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. आतापर्यंत हे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता आम्हाला दिसली नाही. तरी आम्ही जे देशाचे प्रमुख स्तंभ आहेत. त्या स्तंभावरती विश्वास ठेवतो. सर्वोच्च न्यायालयावरती आमचा विश्वास आहे. अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये रामशास्त्री बाण्याचे न्यायमूर्ती आहेत. अजूनही या देशांमध्ये संविधान आणि कायदा जिवंत आहे असे मी मानतो. त्याच्यामुळे ज्या काही घटना या महाराष्ट्रात केंद्राच्या दबावापोटी घडवून आणल्या गेल्यात त्यांचा कट आम्हाला उधळून लावायचा आहे. आम्हाला निवडणूक आयोगाकडून न्याय मिळेल अशी आशा आहे."
राज्यपालांचा छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. एका बाजूला अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांनी केलेली विधाने आहेत. तर दुसऱ्या बाजूला राज्यपालांची विधाने आहेत. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "आम्ही या विरोधात लढतच आहोत. दिल्लीत सत्तेच्या खुर्चीला चिकटलेले इतर सर्व विषयांवर बोलतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानावर बोलत नाहीत. आम्हाला असे वाटले होते कोणीतरी एखादा मायेचा लाल स्वाभिमानी केंद्रामध्ये उभा राहील. केंद्रीय मंत्री आणि पदाचा राजीनामा देईल आणि महाराष्ट्रात परतून शिवाजी महाराजांचा स्वाभिमानासाठी मी आज त्याग केलाय म्हणून अभिमानाने सांगतील. पण, सगळे औलाद आहे... अशी जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी ( Aurangzeb Gujarat connection ) केली आहे.
औरंगजेबाचे गुजरात कनेक्शन : आजच्या दैनिक सामनामधील रोखठोक सदरात औरंगजेबाचे गुजरात कनेक्शन सांगण्यात आले आहे. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "मी याआधी BKC येथील सभेत देखील बोललो होतो. औरंगजेबाचा जन्म कोठे झाला तर तो गुजरातमध्ये झाला म्हणून. देशात काही वेगळे घडतेय का? असा प्रश्न विचारला होता. औरंगजेबाचा जन्म कुठे झाला हे देशाला माहीत नव्हते. औरंगजेबाचा जन्म गुजरात मधल्या दाहोद नावाच्या गावात झाला होता. आणि औरंगजेबाचे वडील हे गुजरातचे पिताश्री होते."