मुंबई - संजय राठोड यांच्या बाबतीत पोलीस चौकशी करत आहेत. ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. कोण गुन्हेगार आहे आणि कोण नाही हे माध्यमांनी ठरवू नये. पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे. सत्य समोर आणण्याची माध्यमांना घाई आहे तर, त्यांनी 'पुछता हैं भारत'ची देखील चौकशी करा, अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.
कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. असे असून देखील राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. त्यांच्या भवितव्यासाठी 3 लाखांपर्यंची योजना आणली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात पुन्हा एकदा सुशासन स्थापन केले आहे, असे सावंत म्हणाले.
शिवजयंती नियमावली-
अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी इतर किल्ल्यांवर जाऊन १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित असल्याचे नियमावलीत म्हटले आहे.
दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.