ETV Bharat / state

रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकसह सॅम्युअल मिरांडाला एनसीबीकडून अटक

रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीसह सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाच्या घरी एनसीबीने छापा टाकला. यानंतर त्यांना चौकशीसाटी एनसीबी कार्यालयात नेण्यात आले होते. चौकशीनंतर शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा याला अटक करण्यात आली आहे.

Samuel Miranda arrested by ncb
शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला अटक
author img

By

Published : Sep 4, 2020, 10:07 PM IST

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)कडून रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा याला अटक करण्यात आली आहे. आज सकाळी एनसीबीने चक्रवर्ती आणि मिरांडा यांच्या घरावर छापा टाकत चौकशी सुरु केली होती. एनसीबीकडून सकाळी शोविक आणि मिरांडा यांना ताब्यात घेत एनसीबीच्या कार्यालयात आणत त्यांची चौकशी सुरु केली होती.

आज सकाळी रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीसह सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाच्या घरी एनसीबीने छापा टाकला. यावेळी एनसीबीच्या टीममध्ये काही महिला अधिकारीही होत्या. छापा टाकण्यात आल्यावर दोघांच्या घरांची झडाझडती घेण्यात आली. त्याला मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आले.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रिया, सॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्तीचे ड्रग्स माफियांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर एनसीबीकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला. याच प्रकरणात जैद या आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.