मुंबई : बॉलीवूड स्टार शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान कार्डेलिया जहाजावर पार्टी करत असताना ड्रग्ज प्रकरण घडले होते. त्या पार्टीत एनसीबीने धाड टाकली होती. त्यावेळेला तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पुढाकारात ती धाड टाकली गेली होती. त्यामध्ये मुंबईच्या बॅलॉर्ड बियर दंडाधिकारी न्यायालयातील एक न्याय दंडाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप केतन तिरोडकर यांनी केलेला आहे. तशी याचिका त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली.
लाच मागितल्याचा आरोप : बहुचर्चित आणि देशभर गाजलेल्या कार्डिलिया जहाजावरील पार्टीमध्ये ड्रग काही लोकांकडे असल्याच्या संशयावर तत्कालीन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांनी त्या वेळेला धाड टाकली होती. अनेक व्यक्तींना त्यामध्ये आरोपी म्हणून न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यामध्ये प्रख्यात बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान देखील होता. त्याला चौकशीला सामोरे जावे लागले. नंतर तुरुंगात जावे लागले होते. आर्यन खानला सोडून देण्यासाठी शाहरुख खानकडे समीर वानखेडे यांनी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेच्या नजरेत असलेले समीर वानखेडे आता या नवीन याचिकेमुळे अधिकच संकटात सापडलेले आहेत.
कार्डलीया ड्रग्ज प्रकरणांमध्ये न्यायदंडाधिकारी : ज्या वेळेला कार्डेलिया जहाजावर काही व्यक्ती पार्टीमध्ये ड्रग बाळगून आहेत. या संशयावर एनसीबीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी छापा घातला. त्यावेळेला त्या पार्टीमध्ये बेलाड पियर दंडाधिकारी न्यायालयातील एक न्याय दंडाधिकाऱ्याचा देखील सहभाग होता. त्यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात देखील घेतले होते. मात्र एनसीबीने छुप्या पद्धतीने त्यांना बाहेर काढलेले आहे, असा दावा केतन तिरोडकर यांनी आपल्या याचिकेमध्ये केलेला आहे. त्यामुळेच हा गंभीर आरोप आहे. म्हणूनच न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने तातडीने ही याचिका प्राथमिक सुनावणीसाठी घेतली. यावेळी केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेच्या वतीने वकील हितेने वेणेगावकर यांनी आक्षेप घेत केतन तिरोडकर यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करायला पाहिजे अशी मागणी केली.
हेही वाचा :
- Shahrukh Khan Extortion case: समीर वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटक करता येणार नाही- मुंबई उच्च न्यायालय
- Sameer Wankhede News : दाऊद इब्राहिमच्या नावाने समीर वानखेडे यांना धमकी; पत्नी क्रांती रेडकर पोलिसात करणार तक्रार
- CBI Affidavit In Court: समीर वानखेडेवरील एफआयआर व आरोप उचित, सीबीआयचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र