मुंबई : समीर वानखेडे यांच्या चौकशी दरम्यान त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्याचप्रमाणे वानखेडे यांच्या विरोधात 11 मे ला सीबीआयने दिल्ली येथे हा गुन्हा नोंदवला. त्याचप्रमाणे त्यांच्या आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या घरांवर छापेमारी केली. कॉर्डेलिया क्रुझवरील छाप्यादरम्यान अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर, नार्कोटीक कंट्रोल ब्युरोचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या इशाऱ्यावरून या प्रकरणात, पंच असलेल्या किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसूजा यांनी शाहरुख खान याच्याकडे 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा उल्लेख सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये केला आहे.
27 लोकांची नावे आली पुढे: त्याचप्रमाणे पंचवीस कोटी रुपयांचा हा सौदा 18 कोटींवर पक्का झाला. गोसावी आणि सॅम्युअल डिसूजा यांनी हे पैसे स्वीकारले. मात्र नंतर 50 लाख परत केले असे, सीबीआयने एफआर मध्ये नमूद केले आहे. याशिवाय कॉर्डिलिया क्रुझ वरील छाप्यादरम्यान 27 लोकांची नावे पुढे आली होती. मात्र, केवळ 17 लोकांना कोणत्याही लेखी नोंदी शिवाय सोडून दिले. तसेच दहा जणांना अटक केली असल्याचा देखील ठपका ठेवण्यात आला आहे.
घरावर सीबीआयने टाकला छापा: त्याचप्रमाणे समीर वानखेडे यांनी महागडी घड्याळ खरेदी विक्री केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच परदेश दौऱ्याचे तपशील देखील समीर वानखेडे यांनी लपवले असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नुकताच समीर वानखेडे यांच्या गोरेगाव येथील घरावर सीबीआयने छापा टाकला असून, समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांचा मोबाईल देखील सीबीआयने जप्त केला आहे. त्यामुळे उद्या जबाबात समीर वानखेडे हे सीबीआयला काय माहिती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -
- CBI Summons Sameer Wankhede समीर वानखेडेंना सीबीआयचे चौकशीसाठी समन्स म्हणाले शेवटच्या श्वासापर्यंत
- Aryan Khan Drug Case समीर वानखेडेने शाहरुख खानकडे 25 कोटींची लाच मागितली होती सीबीआयच्या आरोपपत्रात खुलासा
- CBI Raid On Sameer Wankhede 25 कोटी लाचप्रकरण समीर वानखेडेंच्या घरी दुसऱ्या दिवशीही सीबीआयची छापेमारी