मुंबई - समीर वानखेडे ( Sameer Wankhede ) यांनी ज्ञानेश्वर सिंग यांच्या विरोधात छळ केल्याची तक्रार केली ( Bureau of Narcotics Control ) आहे. ज्ञानेश्वर सिंग हे एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर जनरल ( Deputy Director General of NCB ) आहेत. एनसीवीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, ज्ञानेश्वर सिंह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ( Doctor Babasaheb Ambedkar ) यांचा अपमान केला असून माझ्या कुटुंबीयांसह माझा देखील खूप अपमान करून छळ केला होता. याबाबत दोन महिन्यांपूर्वी मी नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल कास्टकडे ( National Commission of Schedule Cast ) ज्ञानेश्वर सिंह यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. काल दुपारी सिंह यांना नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल कास्ट यांच्याकडून पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली.
वानखेडे यांच्याशी भेदभाव - राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (NCSC) ला 17 ऑक्टोबर रोजी समीर वानखेडे ( Complaint of Sameer Wankhede ) यांची तक्रार प्राप्त झाली आहे. आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. समीर वानखेडे यांनी आयोगाच्या अध्यक्षांची देखील भेट घेतली आहे. या प्रकरणावर वानखेडे यांनी तपशीलवार चर्चा केली आहे. वानखेडे यांच्याशी भेदभाव छळ होत असल्याचे आयोगाचे निरीक्षण आहे. त्यामुळे प्रकरण प्रलंबित असेपर्यंत पुढील कारवाई करू नये असे आयोगाने म्हटले आहे.
आयोगाला माहिती करण्याचे आदेश- आयोगाने सीबीआयसी बोर्डाकडे एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाने सादर केलेली मूळ कागदपत्रे आयोगासमोर सादर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये असे लिहिले आहे की, ही नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती माहिती ई-मेल/पोस्टद्वारे किंवा व्यक्तिशः आयोगाला सादर करावी. विहित मुदतीत आयोगाला तुमच्याकडून उत्तर न मिळाल्यास, आयोग भारतीय राज्यघटनेच्या कलम ३३८ अन्वये दिलेल्या दिवाणी न्यायालयांच्या अधिकारांचा वापर करण्यात येईल असे म्हटले आहे.
समीर वानखेडे यांच्या जातीवरून वाद - विशेष म्हणजे, एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जातीवरून वर्षभर चाललेला वाद रंगला होता. मात्र, समितीने गेल्या ऑगस्टमध्ये वानखेडे यांना क्लीन चिट दिली होती. समितीने समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र कायम ठेवले आहे. कास्ट छाननी समितीने 91 पानांच्या आदेशात वानखेडे हे जन्माने मुस्लिम असल्याचा युक्तिवाद फेटाळला आहे. समीर वानखेडे, त्यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग केलेला नाही. तसेच मुस्लिम धर्म स्वीकारला नाही, असे चौकशी समितीने आपल्या आदेशात म्हटले आहे. समितीने पुढे सांगितले की, समीर वानखेडे, त्याचे वडील महार-37 हे अनुसूचित जातीचे असल्याचे म्हटले आहे.गेल्या वर्षी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या धर्मासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. समीर यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी मुस्लिम धर्म स्वीकारत लग्न केल्याचा दावा करतानाच, समीर हे जन्माने मुस्लिम असल्याचा दावादेखील मलिक यांनी केला होता. यानंतर हे प्रकरण जात पडताळणी समितीसमोर गेले होते.