ETV Bharat / state

CBI Raid On Sameer Wankhede : 25 कोटी लाचप्रकरण; समीर वानखेडेंच्या घरी दुसऱ्या दिवशीही सीबीआयची छापेमारी - समीर वानखेडे

एनसीबीचे तत्कालिन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयने देशभरात तब्बल 29 ठिकाणी छापेमारी केली होती. ही छापेमारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे.

CBI Raid On Sameer Wankhede
एनसीबीचे तत्कालिन विभागीय संचालक समीर वानखेडे
author img

By

Published : May 13, 2023, 11:54 AM IST

Updated : May 14, 2023, 3:25 PM IST

समीर वानखेडे यांच्या घरावर छापेमारी

मुंबई : एनसीबीचे तत्कालिन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने लाचप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सीबीआयने तब्बल 29 ठिकाणी छापेमारी केली होती. ही छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. समिर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक न करण्यासाठी 50 कोटी रुपये लाच मागितल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

काय आहे लाचप्रकरण : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कॉर्डिया क्रूझ जहाजावर छापेमारी केली होती. या छापेमारीत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा आढळून आला होता. त्याच्यावर ड्रग्ज बाळगल्याचा ठपका ठेवत एनसीबीने त्याला अटक केली होती. त्यामुळे त्याला सोडण्यासाठी 50 कोटीची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आल्याचा ठपका वानखेडेंवर ठेवण्यात आला आहे.

सीबीआयने दाखल केला गुन्हा : समीर वानखेडे हे मुंबईत एनसीबीचे विभागीय संचालक असताना त्यांनी आर्यन खानला आरोपातून सोडण्यासाठी 50 कोटी रुपयाची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी एनसीबीने त्यांच्याविरोधात अहवाल देऊन तो सीबीआयला सोपवला होता. समीर वानखेडे यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोपही एनसीबीच्या अहवालात करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणात सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या चार सहकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्यन प्रकरणात 50 लाख आगाऊ घेतल्याचा आरोप : कॉर्डिया क्रूझ जहाजावर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर 2021 ला छापेमारी केली होती. या छापेमारीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा देखील असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे शाहरुख खानच्या मुलाला सोडून देण्यासाठी 50 कोटीची मागणी करण्यात आली. यावेळी 50 लाख रुपये आगाऊ घेण्यात आल्याचा ठपका एनसीबीच्या अहवालात ठेवण्यात आला. याबाबत सीबीआयला माहिती मिळाल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांच्या गोरेगाव येथील घरांसह देशभरातील 29 ठिकणी छापेमारी केली आहे. यात दिल्ली, रांची, कानपूर आदी ठिकाणांचा समावेश आहे.

हेही वाचा -

  1. Karnataka election results 2023 : भाजपाचा 'हनुमान' कुमारस्वामी; सत्तेसाठी भाजपाची जेडीएसला हाक
  2. Mumbai Murder : पत्नीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्याची दगडाने ठेचुन हत्या
  3. MES Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 निकालात सीमावर्ती भागात एमईएस उधळणार गुलाल

Last Updated : May 14, 2023, 3:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.