मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल व दाऊदचा खास हस्तक इक्बाल मिरची याच्या पत्नीच्यामार्फत प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईतील एका इमारतीचा व्यवहार केल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. मुंबईच्या अंधेरी परिसरातील सिजे बिल्डिंग या इमारतीचा व्यवहार करत असताना केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल व इकबाल मिरची याची पत्नी हजरा इक्बाल यांच्यात 2004 मध्ये व्यवहार सुरू झाला होता, जो 2007 पूर्ण करण्यात आला आहे.
हेही वाचा - मनसेचा उमेदवार 'चंपा'ची चंपी करणार - राज ठाकरे
युपीएच्या काळात केंद्रीय मंत्री असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी हा व्यवहार इथेपर्यंतच मर्यादित ठेवला होता का? याचे उत्तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी द्यावे, अशी मागणी संबित पात्रा यांनी केली. दाऊदसोबत संबंध असणाऱ्या एनसीपीशी आघाडी करणाऱ्या काँग्रेसच्या सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांनी सुद्धा याबद्दल खुलासा करावा, अशी मागणी संबित पात्रा यांनी केली आहे.
हेही वाचा - शरद पवारांच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांनी दिले मजेशीर उत्तर
यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, या विषयी आपल्याला अधिक माहिती नसून भाजपने आरोप न करता त्यांची सत्ता व यंत्रणा असल्याने स्वतःहून चौकशी करावी.