ETV Bharat / state

१८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन, रात्री १२ पर्यंत व्हीजेटीआयमध्ये ज्ञानाचा जागर

सलग १८ तास अभ्यास करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. शनिवारी  पहाटे ६ वाजल्यापासून माटुंग्यातील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी अभिवादनाला सुरुवात केली आहे.

author img

By

Published : Apr 13, 2019, 8:00 PM IST

१८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन

मुंबई - सलग १८ तास अभ्यास करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. शनिवारी पहाटे ६ वाजल्यापासून माटुंग्यातील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी अभिवादनाला सुरुवात केली आहे. या ठिकाणी मध्यरात्री १२ पर्यंत अभ्यास सुरू राहणार आहे. १५० हुन अधिक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असून ५० विद्यार्थ्यांनी या अभिवादनामध्ये सहभाग घेतला आहे.

या अभियानामध्ये कॉम्पुटर, इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा, डिग्री, पीएचडी, अशा ९ विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही या अभियानात सहभागी झाले आहेत. तसेच प्रा. डॉ. बी. बी. मेश्रामही यावेळी १८ तास संविधान या विषयावर अभ्यास करत आहेत. मेश्राम हे १९९३ पासून व्हीजेटीआयमध्ये कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांबरोबर अभ्यास करून छान वाटत आहे. बाबासाहेबांनी खूप कष्ट करून सर्वाना दिशा दाखवली. त्यांच्याकडील काही गुण युवापिढीने घेणे अपेक्षित असल्याचे मेश्राम यांनी यावेळी सांगितले.

१८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन

शैक्षणिक जीवनात बाबासाहेब सलग १८ तास अभ्यास करत असत. त्यामुळेच त्यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला आहे. मुलांमध्ये अभ्यास करण्याची क्षमता, सामाजिक बांधिलकी वाढावी, हा या अभियानामागचा उद्देश आहे. त्याबरोबरच पुढील वेळी यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करणार असल्याचे प्राध्यापक डॉ. वा. भि. निकम यांनी सांगितले. तर या अभियानामुळे माझ्यात अभ्यास करण्याची किती क्षमता आहे, हे समजेल, असे विद्यार्थी अक्षदा खाटेकर याने सांगितले.

या अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या संगणक विभागाचे वा. भि. निकम, डॉ. सुषमा वाघ, डॉ. अभय बाम्बोळे आणि ग्रंथालयातील कर्मचारी जी. डी. मालवणकर यांचे सहकार्य लाभले.

सलग अठरा तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन, आज रात्री 12 पर्यंत व्हीजेटीआयमध्ये ज्ञानाचा जागर

मुंबई | 

सलग 18 तास अभ्यास करून भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या 128 व्या जयंती निमीत्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. 
शनिवारी  पहाटे सहा वाजल्यापासून माटुंग्यातील व्हीजेटीआय या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी विनम्र अभिवादनाला सुरुवात केली आहे. मध्यरात्री 12 पर्यंत अभ्यास सुरू राहणार आहे. या ठिकाणी 150 हुन जास्त विद्यार्थी उपस्थित असून  50 विद्यार्थीनी  सहभागी आहेत. कॉम्पुटर, इलेक्ट्रॉनिक  डिप्लोमा, डिग्री   पी एच डी असा 9  विभागातील  मुलांनी  या अभियानामध्ये सहभाग घेतला आहे.  यावेळीचे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक ही या अभियानात सहभागी झाले होते. प्राध्यापक  डॉ बी बी मेश्राम ही यावेळी 18 तास संविधान या विषयावर अभ्यास करत आहेत. मेश्राम हे 1993 पासून व्ही जे टी आय मध्ये कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांबरोबर अभ्यास करून खूप बर वाटत आहेत. बाबासाहेबांनी खूप कष्ट करून सर्वाना दिशा दाखवली. त्यांच्याकडील काही गुण युवापिढीने घेणे अपेक्षित आहे असे मेश्राम यांनी सांगितले.
 
शैक्षणिक जीवनात बाबासाहेब सलग 18 तास अभ्यास करत, त्यामुळेच त्यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी 18 तास अभ्यास करायचे. त्यांची  जाणीव   मुलांना झाली  पाहिजे.   अभ्यास करण्याची  क्षमता, सामाजिक  बांधीलकी  वाढावी  हा या  अभियाना  मागचा  उद्देश  आहे. तसेच पुढील  वर्षी  यापेक्षा  जास्त  विद्याथ्यांना सहभागी करू  असे  प्राध्यपक डॉ. वा. भि  निकम यांनी  सांगितले. हे अभियानातून  आज  मला कळेल माझ्यात अभ्यास करण्याची क्षमता किती आहे. बाबासाहेबानी आपल्या  देशाचे संविधान लिहले  आज कळतंय  कि  त्यांना  किती परिश्रम घ्यावे लागले असतील. असे अक्षदा खाटेकर या  विद्यार्थीने सांगितले.     
 या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या संगणक  विभागाचे वा बी निकम डॉ. सुषमा वाघ पाहत आहेत.  डॉ. अभय बाम्बोळे आणि  ग्रंथालयातील कर्मचारी जी. डी. मालवणकर यांचे सहकार्य लाभले आहे.

बाईट

अक्षदा खाटेकर 

संतोष जाधव

चेतन वारके

वा बी निकम 
 
डॉ. अभय बाम्बोळे

डॉ बी बी मेश्राम

नोट 

कॅमेरामन अनिल निर्मल यांनी विडिओ live 007 pathavale aahet

Slug

Vjti reding tribute

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.