मुंबई : टेरर फंडिंगच्या आरोपाखाली सलीम फ्रुटला केली ( Salim Fruit Family Traveled to Pakistan Three Times ) होती. यानंतर या प्रकरणात सलीम फ्रुटच्या पत्नीचा ( Wedding of Chhota Shakeel Daughter ) जबाब नोंदवण्यात आला होता. त्यावेळी 2013 मध्ये शकीलची मुलगी झोयाच्या साखरपुड्याला ( NIA Filed Chargesheet in Terror Funding Case in Court ) एंगेजमेंटला उपस्थित राहण्यासाठी पहिल्यांदा पाकिस्तानला गेले होती. त्यानंतर मार्च 2014 मध्ये शकीलची धाकटी मुलगी अमनच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सप्टेंबर 2014 मध्ये पुन्हा झोयाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ते दुसऱ्यांदा पाकिस्तानला गेले होते, असे आरोपपत्रामध्ये सांगण्यात आले आहे.
सलीम फ्रुट छोटा शकीलच्या मुलींच्या साखरपुडा आणि लग्न समारंभात सहभागी मुंबई मोहम्मद सलीम इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट त्याचे कुटुंबीय आपल्या मेहुणा गँगस्टर छोटा शकीलच्या पाकिस्तानमधील कराची येथील मुलींच्या साखरपुडा आणि लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांचा वापर पाकिस्तानमध्ये जाण्याकरिता करण्यात आला नव्हता, असे कुरेशीच्या पत्नीने राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिलेल्या जबाब सांगितले आहे. NIA ने फ्रूटची पत्नी साझियाचे जवाब टेरर फंडिंग दहशतवादी निधी प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात जोडला आहे. ज्यात फ्रूट, शकीलचा मेहुणा आरिफ अबुबकर शेख उर्फ आरिफ भाईजान आणि इतरांना अटक करण्यात आली आहे.
सलीम फ्रुटचे कुटुंब दुबईतून तीन वेळा बेकायदेशीरपणे पाकिस्तानात या वर्षी 20 ऑगस्ट रोजी एनआयएने नोंदवलेल्या तिच्या बयाणात, शकीलची पत्नी नझमाची बहीण साझिया म्हणाली की, त्यांचे संपूर्ण कुटुंब तिचा नवरा आणि मुले दुबईतून तीन वेळा बेकायदेशीरपणे पाकिस्तानात गेले. 2013 मध्ये शकीलची मुलगी झोयाच्या एंगेजमेंटला उपस्थित राहण्यासाठी पहिली ट्रिप केली होती. त्यांनी मार्च 2014 मध्ये शकीलची धाकटी मुलगी अनमच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आणि सप्टेंबर 2014 मध्ये पुन्हा झोयाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी पाकिस्तानला प्रवास केला.
पाकिस्तानी एअरलाइन्सच्या विमानाने कराचीत गेलो 24 मार्च 2014 रोजी ते पाकिस्तानमध्ये कसे घुसले याबद्दल खुलासा करताना साझिया म्हणाली मी पाकिस्तानी एअरलाइन्सच्या विमानाने कराची पाकिस्तानला गेले होते. छोटा शकीलने पाठवलेल्या एका व्यक्तीने आम्हाला कराची विमानतळावरून शिक्क्याशिवाय बाहेर काढले आणि सगाई समारंभात सहभागी होण्यासाठी छोटा शकीलच्या घरी गेलो.
प्रवासाची व्यवस्था छोटा शकीलनेच केली कुटुंबाने असा दावा केला की प्रवासाची व्यवस्था शकीलनेच केली होती. ज्याने यूएईमधून परतीची तिकिटेदेखील बुक केली होती. आम्ही कराची येथे छोटा शकीलच्या घरी 5 ते 6 दिवस राहिलो. त्यानंतर छोटा शकीलने पाठवलेल्या एका व्यक्तीने UAE कराचीहून तिकिटांची व्यवस्था केली. आम्ही कराची विमानतळावर पुन्हा शिक्क्यांशिवाय प्रवेश केला. त्यांच्या पासपोर्टवर ते पाकिस्तानात प्रवेश करून बाहेर गेल्याचे दर्शवतात. मी माझ्या मुलांसह यूएईला गेलो होतो. UAE मधून आम्ही भारतात आलो साझियाने तिच्या जवाबत म्हटले आहे.
तिसर्या भेटीत फ्रूट त्यांच्यासोबत गेले सप्टेंबर 2014 मध्ये त्यांच्या तिसर्या भेटीत फ्रूट त्यांच्यासोबत गेले होते. साझियाने दावा केला की ती आणि त्यांची मुले 5-6 दिवस राहिली तर फ्रूट फक्त एक किंवा दोन दिवस राहिले आणि नंतर रियाधला गेले. रियाधच्या प्रवासासाठीही त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे मागितली गेली नाहीत. तिने दावा केला की त्याला त्याच्या पासपोर्टवर कोणत्याही शिक्क्याशिवाय विमानतळावर प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली होती.