मुंबई - कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जात आहे. प्रवासी वाहतुकीसाठी चारचाकी गाड्यांची सेवा देणाऱ्या कंपन्यांनी प्रवासी व चालकाच्या सुरक्षेच्यादृष्टीने वाहनांच्या मध्यभागी पारदर्शक सुरक्षा कवच लावण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी सुरू केल्याचे दिसत आले.
शहरातील बेस्टकडून बसमध्ये ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर पारदर्शक सुरक्षा कवच काचेची व्यवस्था यापूर्वीच करण्यात आली आहे.
मुंबईतील टुरिस्ट कारमधून प्रवाशांची ने आण होते. त्यामुळे आता टुरिस्ट कंपन्यांनी कोरोना विषाणुचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेत चारचाकी वाहनात पारदर्शक सुरक्षा कवच बसवले आहे. या नवीन बदलाचे प्रवासी व चालकांनी स्वागत केले आहे.
परदेशी पर्यटकाच्या सान्निध्यात आलेल्या टॅक्सी चालकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पारदर्शक सुरक्षा कवच बसवण्याच्यानिर्णयाचे चालकांनी स्वागत केले आहे.