ETV Bharat / state

मालेगाव बॅाम्ब स्फोटासंदर्भात मला काहीही  माहिती नाही, साध्वी प्रज्ञा सिंह यांचे न्यायालयात उत्तर - न्यायालय

मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोटासंदर्भात आपणास काही माहिती होती का? असा प्रश्न न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना विचारला. यावर 'मला याबद्दल काहीही माहीत नाही, असे उत्तर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी दिले आहे. तर याच प्रकरणातील दुसरा आरोपी समीर कुलकर्णी याने न्यायालयाच्या याच प्रश्नावर याबद्दल मला माहिती आहे आणि हे वास्तव असून सत्य आहे, असे उत्तर दिले.

न्यायालयात जातांना साध्वी प्रज्ञा सिंह
author img

By

Published : Jun 7, 2019, 3:05 PM IST

Updated : Jun 7, 2019, 3:20 PM IST

मुंबई - मालेगाव बॉम्ब स्फोटासंदर्भात न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना न्यायालयाने हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी मुंबईतील विशेष न्यायालयात साध्वी प्रज्ञा सिंह सुनावणीसाठी हजर झाल्या. यावेळी त्यांनी न्यायालयात बॉम्ब स्फोटासंदर्भात आपल्याला काहीच माहिती नसल्याचे उत्तर दिले आहे.

मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोटासंदर्भात आपणास काही माहिती होती का? असा प्रश्न न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना विचारला. यावर 'मला याबद्दल काहीही माहीत नाही, असे उत्तर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी दिले आहे. तर याच प्रकरणातील दुसरा आरोपी समीर कुलकर्णी याने न्यायालयाच्या याच प्रश्नावर याबद्दल मला माहिती आहे आणि हे वास्तव असून सत्य आहे, असे उत्तर दिले.

याच प्रकरणातील तिसरा आरोपी दयानंद पांडे याने याबद्दल मला काहीही माहित नसून, मालेगावचे नाव मी पहिल्यांदाच ऐकले होते, असे उत्तर दिले. साध्वी प्रज्ञा सिंह यांना न्यायालयाने विचारले की, तुम्हाला माहिती आहे का? किती साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे, त्यावर आतापर्यंत किती साक्ष झाल्या हे मला माहित नसल्याचे साध्वी म्हणाल्या.

मालेगाव स्फोटातील मृतांचे नातेवाईकदेखील या सुनावणीला हजर होते. यावेळी डॉक्टर, मेडिकल ऑफिसर आणि जखमींचे जवाब नोंदवण्यात आले.

Intro:2008 मालेगाव बॉम्ब ब्लास्ट संदर्भात न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंग हिला न्यायालयाने फटकारले असता , शुक्रवारी मुंबईतील विशेष न्यायालयात साध्वी प्रज्ञा सिंग सुनावणी हजर झाली. आजच्या सुनावणीत न्यामुर्तींनी साध्वी प्रज्ञा सिंगसह इतर आरोपीना काही प्रश्न विचारले. Body:2008 साली मालेगाव बॉम्बस्फोट झाला याबद्दल काही माहिती होती का ? असा प्रश्न न्यायालयाने कोर्टात हजर असलेल्या आरोपीना विचारला असता यावर आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर मला याबद्दल काहीही माहीत नाही असं म्हटलं आहे. तर याच प्रकरणातील दुसरा आरोपी समीर कुलकर्णी याने न्यायालयाच्या प्रश्नावर हो हे वास्तव आहे आणि सत्य आहे अस उत्तर दिले. या प्रकरणातील आणखीन एक आरोपी दयानंद पांडे याने याबद्दल मला काहीही माहित नसून मालेगाव चे नाव मी पहिल्यांदाच ऐकले होते.Conclusion:मालेगाव ब्लास्ट प्रकरणात मृतांचे नातेवाईक, डॉक्टर , मेडिकल ऑफिसर , जखमी यांचे जबाब नोंदवले आहेत . तुम्हाला माहीत आहे का किती साक्षीदारांचे साक्ष नोंदवली आहेत ? असा प्रश्न न्यायालयाने आरोपीना केल्यावर साध्वी प्रज्ञा सिंग हिने माहीत नाही , साक्षी झाल्यात माहीत आहे . पण किती जनांच्या साक्षी झाल्यात माहीत नाही अस उत्तर दिले आहे.
Last Updated : Jun 7, 2019, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.