ETV Bharat / state

रयत क्रांती संघटनेला हातकणंगले मतदारसंघाची एक जागा सोडावी; सदाभाऊ खोत यांची मागणी - महाराष्ट्रात भाकरी परतणार

Lok Sabha Election २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा मतदारसंघ निहाय उमेदवारांची चाचपणी आणि निश्चितीकरण सुरू असतानाच महायुतीच्या पश्चिम महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता मावळली आहे. या चार जागांवर भाजपा आणि शिंदे गटाने दावा करीत नवा उमेदवार देण्याचा विचार सुरू केला आहे.

Sadabhau Khot News
सदाभाऊ खोत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 10:38 PM IST

प्रतिक्रिया देताना सदाभाऊ खोत

मुंबई Lok Sabha Election २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं महायुतीनं पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचं रणशिंगच फुंकलं आहे. लोकसभेचे जागावाटप आणि आगामी रणनिती याविषयी महायुतीमध्ये सध्या दररोज चर्चा आणि बैठका सुरू आहेत. मतदार संघनिहाय आढावा घेतला जात आहे. त्यानुसार कोणत्या मतदार संघांमध्ये कोणत्या पक्षाचं प्राबल्य आहे आणि विद्यमान खासदार यांची काय स्थिती आहे, याबाबतचा अहवाल घेतला जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रातला अहवाल नकारात्मक : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये चार मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदारांबाबत जनतेत रोष आणि नाराजी असल्याचं दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन मतदारसंघांमध्ये धैर्यशील माने आणि प्राध्यापक संजय मंडलिक हे विद्यमान खासदार आहेत. त्यांना पुन्हा संधी दिली जाईल असं वचन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, मात्र सध्या परिस्थिती पाहता हे उमेदवार निवडून येणार नसल्यानं भारतीय जनता पक्षाने या जागांवर दावा सांगितला आहे. तर दुसरीकडं सांगली मतदारसंघातून संजय पाटील यांच्या नावाला विरोध होत असून या ठिकाणी गोपीचंद पडळकर, पृथ्वीराज देशमुख आणि चंद्रहार पाटील यांची नावे समोर येत आहेत. त्यामुळं संजय पाटील यांच्या उमेदवारी बाबत अनिश्चितता आहे. सोलापूर मतदार संघातूनही जय सिद्धेश्वर स्वामी यांच्या कामाबाबत पक्षातूनच नाराजी व्यक्त होत असल्यानं, त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

कोल्हापुरातील मतदासंघांची तयारी पूर्ण : या संदर्भात बोलताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य राहुल चिकोडे म्हणाले की, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा जागे संदर्भात राज्यातील महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाची कोअर कमिटी यासंदर्भात निर्णय घेईल. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची संधी निवडणुकीतून मिळते. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाची जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आल्यास भाजपाचा कार्यकर्ता दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करेल यात मात्र शंका नाही. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या जागांवर आमचा दावा आहे असंही चिकोडे म्हणाले.

कोल्हापुरात आमची ताकद : यासंदर्भात बोलताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ म्हणाले की, आम्ही कोल्हापुरामध्ये महाअधिवेशन घेत आहोत मात्र कोल्हापूर मधील आमच्या उमेदवारांची ताकद कमी झाली म्हणून नव्हे तर पक्षाला अधिक बळ मिळावे म्हणून या जागांवर कोणता उमेदवार द्यायचा याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असे शिरसाठ यांनी स्पष्ट केले.

हातकणंगले जागेवर रयत क्रांतीचा दावा : जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघावर रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी दावा केला आहे. गत लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही प्रचंड मेहनत घेतली होती. मात्र आयत्या वेळेस दुसरा उमेदवार येऊन पीक कापून गेला आता यावेळेस आम्ही पूर्ण मशागत केली आहे. पेरणी सुद्धा आम्ही करणार आणि पीक सुद्धा आम्ही घेणार असा दावा, सदाभाऊ खोत यांनी केला आहे. त्यामुळं रयत क्रांती संघटनेला हातकणंगले मतदारसंघाची एक जागा सोडावी अशी मागणी, आपण महायुतीत केली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा -

  1. Sadabhau Khot : 'भारता'तल्या जनतेकडं लक्ष द्या, अन्यथा 'इंडिया' जड जाईल; सदाभाऊ खोतांचा घरचा आहेर
  2. Sadabhau Khot : शेतकऱ्यांची पदयात्रा अडवल्याने सदाभाऊ खोत आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, रास्ता रोकोमुळे पोलिसांची तारांबळ
  3. लोकसभा निवडणुकीचे वाजू लागले पडघम, शिवसेना शिंदे गटाचं ६ जानेवारीपासून शिवसंकल्प अभियान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.