ETV Bharat / state

ऊसाच्या धर्तीवर दुधालाही FRP किंवा MSP मिळावी; दूध दरवाढीसाठी सदाभाऊ खोतांचे आंदोलन - दुध दरवाढीसाठी सदाभाऊ खोतांचे आंदोलन

दूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज मंत्रालयाच्या बाहेर माजी राज्य कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. 'ऊसाच्या धर्तीवर दुधालाही FRP किंवा MSP मिळावी', अशी मागणी यावेळी खोत यांनी केली.

mumbai
mumbai
author img

By

Published : Jun 10, 2021, 3:53 PM IST

मुंबई - कोरोनाच्या परिस्थितीत शेतकरी हवालदील झाले आहेत. त्यातच दुधाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज (10 जून) माजी राज्य कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली दुधासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी दुधासाठी मंत्रालयासमोर आंदोलन केले. यावेळी दूध उत्पादक शेतकरी व कार्यकर्तेही होते.

दूध दरवाढीसाठी सदाभाऊ खोत आक्रमक, मंत्रालयासमोर आंदोलन

'ऊसाच्या धर्तीवर दुधालाही FRP किंवा MSP मिळावी'

'राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार ३/५ फॅट व ८/५ एसएनएफनुसार किमान २५ रुपये प्रतिलिटर दर देणे आवश्यक आहे. मात्र, या आदेशाला सहकारी व खासगी दूध संस्थाकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. तर, दुसरीकडे दुधाला कमी भाव देणाऱ्या संस्था व खासगी कंपन्यांवर कोणतीही कारवाई करण्याचे काम दुग्ध विकास विभागाकडून होत नाही. इतकेच नाही तर खासगी दूध संस्था व खासगी कंपन्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याप्रमाणे ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांच्यामध्ये ऊसासाठी किमान आधारभूत किंमत (FRP) आहे. त्याच धर्तीवर दुधालाही FRP किंवा MSP मिळावी. महाराष्ट्रातील दुध उत्पादकांना समान भाव देणे गरजेचे आहे', असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

'आत्महत्या रोखण्यासाठी दुधाला भाव द्या'

'ऊसासाठी रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार ७०/३० चा फॉर्म्युला आहे. त्याप्रमाणे दूध उत्पादकांसाठी किमान ८५/१५ चा फॉर्म्युला करणे गरजेचे आहे. सध्या कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघामध्ये ८१/१९ चा फॉर्म्युला कार्यरत आहे. १९६६-६७ नंतर संगणकीकरणाचा तंत्रज्ञानयुक्त वापर दिसत नाही. गिर, धारपारकर या आमच्या गाई ब्रीड जागतिक आदर्शवत आहेत. या जातींच्या गाईंचे संगोपन होणे गरजेचे आहे. दुधाला भाव नसल्यामुळे महाराष्ट्रात अनेक दूध उत्पादकांनी आत्महत्या केल्या आहेत. किमान राज्य सरकारने जाहीर केलेल्या दराप्रमाणे दूध उत्पादकांना भाव मिळणे गरजेचे आहे', अशा मागण्या सदाभाऊ यांनी केल्या आहेत.

शेतकऱ्यांना दिलास देण्याची कबुली

दरम्यान, या सर्व मागणीसाठी सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मुंबईतील मंत्रालयाच्या समोर आंदोलन केले. यावेळी दुग्धविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यांची मंत्रालयामध्ये भेट घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे सचिवांनी कबुल केले आहे.

हेही वाचा - मालाड इमारत दुर्घटना हे मुंबई महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी घडवलेले योजनाबद्ध हत्याकांड- राम कदम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.