मुंबई Sachin waze Granted Bail: विमल अग्रवाल या व्यापाराच्या तक्रारीवरून खंडणी मागितल्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मुंबई सत्र न्यायालयाचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो यांच्याकडून सचिन वाझे याची चौकशी सुरू आहे. अग्रवाल या उद्योजकाकडून खंडणी मागितल्या प्रकरणी एक खटला त्याच्यावर दाखल होता. त्या प्रकरणांमध्ये आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायालयाने सचिन वाझे याला जामीन मंजूर केलेला आहे.
हॉटेल चालवण्यासाठी खंडणी मागितली: माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर देखील आरोप आहे. व्यापारी असलेल्या विमल अग्रवाल यांनी अनेक आरोप सचिन वाझे यांच्यावर केलेले आहे आणि तशी तक्रार देखील केली होती. कोविड महामारीच्या साथीच्या काळामध्ये हॉटेल चालवण्यासाठी विमल अग्रवाल यांच्याकडून खंडणी मागितली होती. या प्रकरणी दाखल एफआयआरमध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गुंड रियाज भाटी, सचिन वाझे, सुमित सिंग आणि अल्पेश पटेल यांचे देखील नाव आहे.
- या दोघांना अटक नाही: व्यापारी विमल अग्रवाल याच्याकडून खंडणी मागितल्याच्या तक्रारीनंतर सचिन वाझे, सुमित सिंग आणि अल्पेश पटेल यांना अटक करण्यात आली होती. मात्र परमबीर सिंग, रियाझ भाटी यांना अटक करण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी सुमित सिंग आणि अल्पेश पटेल यांना जामीन मिळाला होता.
एका खटल्यात सचिन वाझेला जामीन नाकारला: मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था आणि ईडीकडून सचिन वाझेवर खटला दाखल आहे. एकूण चार खटल्यांपैकी दोनचा तपास सीबीआयकडे आहे आणि एकाचा ईडीकडे तपास आहे. एका खटल्यात आता दोन लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलेला आहे. मात्र, राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयाने याआधी एका खटल्यात सचिन वाझेचा जामीन ना मंजूर केलेला आहे.
हेही वाचा: