ETV Bharat / state

पूनम महाजनांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा काँग्रेसचा आरोप; न्यायालयात जाण्याचा इशारा - court

भाजप उमेदवार पूनम महाजन यांनी प्रतिज्ञापत्रात आयोगाला खोटी माहिती दिली. महाजन यांच्या पतीसोबत २ कंपन्यातील व्यवहाराबाबत महाजन यांनी माहिती दिली नाही. तसेच पूनम महाजन यांनी कोट्यवधींचे बँकांचे कर्ज हेतुपुरस्सर थकवलेले असल्याचा आरोप सावंत यांनी केला.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची पत्रकार परिषद
author img

By

Published : Apr 27, 2019, 7:39 PM IST

मुंबई - उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार पूनम महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आर्थिक माहिती लपवली आहे. त्यांनी कर्ज न फेडल्याप्रकरणी बँकांनी त्यांच्यावर दावा दाखल केल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. माहिती लपवून महाजन यांनी लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग केला आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. मुंबई काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सावंत यांनी यासंदर्भात माहिती दिली.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची पत्रकार परिषद

भाजप उमेदवार पूनम महाजन यांनी प्रतिज्ञापत्रात आयोगाला खोटी माहिती दिली. महाजन यांच्या पतीसोबत २ कंपन्यातील व्यवहाराबाबत महाजन यांनी माहिती दिली नाही. तसेच पूनम महाजन यांनी कोट्यवधींचे बँकांचे कर्ज हेतुपुरस्सर थकवलेले असल्याचा आरोप सावंत यांनी केला. याबाबत पंजाब नॅशनल बँक आणि भारतीय स्टेट बँकेने महाजन यांच्याविरोधात दावा दाखल केल्याची माहितीही त्यांनी आयोगाला दिली नसल्याचे सचिन सावंत यांनी सांगितले.

फिनिक्स ऑटो प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महाजन यांचे पती वजेंदा वेंकटेश राव त्यांची असून या कंपनीत पूनम महाजन ही २०१५ पर्यंत संचालक होत्या. तसेच आद्य मोटर कार आणि आद्य रेअलेटर्स या कंपन्यांमध्येही पूनम महाजन संचालक होत्या. या कंपन्याच्या नावे एकूण ६७ कोटी ८५ लाख रुपयांचे थकीत कर्ज आहे. आर्थिक क्षेत्राचा अहवाल देणाऱ्या सीबील या संस्थेने याबाबतची माहिती १२ एप्रिलला दिली असल्याचेही सावंत यांनी सांगितले. ही सर्व माहिती महाजन यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना होती. मात्र, त्यांनी निवडणूक आयोगापासून ही माहिती लपवली असल्याने काँग्रेस याबाबत न्यायालयात जाणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले. काँग्रेसच्या आरोपांबाबत महाजन यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Intro:भाजप उमेदवार पूनम महाजन यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली, न्यायालयात जाण्याचा काँग्रेसचा इशारा

मुंबई 27

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या भाजप उमेदवार पूनम महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञा पत्रात आर्थिक माहिती लपवली असून हेतुपुरस्सर कर्ज न फेडल्या प्रकरणी बँकांनी त्यांच्यावर दावा दाखल केल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. माहीती लपवून महाजन यांनी लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग केला असून त्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा ही सावंत यांनी दिला.मुंबई काँग्रेस कार्यलयात पत्रकार परिषदेत सावंत यांनी इशारा दिला आहे.

भाजप उमेदवार पूनम महाजन यांनी प्रतिज्ञापत्रात आयोगाला खोटी माहिती दिली . महाजन यांच्या पती सोबत दोन कंपन्यातील व्यवहाराबाबत महाजन यांनी माहिती दिली नाही. तसेच पूनम महाजन यांनी कोट्यवधींचे बँकांचे कर्ज हेतुपुरस्सर थकवलेले असल्याचा आरोप सावंत यांनी केला . याबाबत पंजाब नॅशनल बँक आणि भारतीय स्टेट बँकेने महाजन यांच्या विरोधात दावा दाखल केल्याची माहिती ही त्यांनी आयोगाला दिली नसल्याचे सचिन सावंत यांनी सांगितले.
फिनिक्स ऑटो प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महाजन यांचे पती वजेंदा वेंकटेश राव त्यांची असून या कंपनीत पूनम महाजन ही 2015 पर्यंत संचालक होत्या. तसेच आद्य मोटर कार आणि आद्य रेअलेटर्स या कंपन्यांमध्ये ही पूनम महाजन संचालक होत्या. या कंपन्याच्या नावे एकूण 67 कोटी 85 लाख रुपयांचे थकीत कर्ज आहे. आर्थिक क्षेत्राचा अहवाल देणाऱ्या सीबील या संस्थेने याबाबतची माहिती 12 एप्रिलला दिली असल्याचे ही सावंत यांनी सांगितले. ही सर्व माहिती महाजन यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना होती. मात्र त्यांनी निवडणूक आयोगापासून ही माहिती लपवली असल्याने काँग्रेस याबाबत न्यायालयात जाणार आल्याचेही सावंत यांनी सांगितले. काँग्रेसच्या आरोपांबाबत महाजन यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. Body:.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.