मुंबई - सतराव्या लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही मतदारसंघातून प्रत्येकी दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे.
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून वारिस अली नसीर अहमद फारुकी व अब्बू देवेंद्र (श्री.आरुमुगम एम.देवेंद्र) या दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे या मतदारसंघात आता १७ उमेदवार निवडणूक लढणार आहेत. तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उत्तमचंद राजमल जैन आणि मो. नईम शेख या दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या मतदारसंघात आता १३ उमेदवार आहेत.
मुंबई दक्षिण मध्य -
बाळासाहेब जगन्नाथ साबळे (भारतीय मानवधिकार फेडरेल पार्टी), गॉडफ्रे वॉशिंग्टन नोबल (देसिया मक्कल सक्थी कच्ची), संतोष श्रीवास्तव (अपक्ष), योगेश विठ्ठल मोरे (बहुजन रिपब्लीकन सोशॅलिस्ट पार्टी), राहुल रमेश शेवाळे (शिवसेना), महेंद्र तुळशीराम भिंगारदिवे (अँन्टी करप्शन डायनामिक पार्टी), एकनाथ महादेव गायकवाड (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), संजय सुशील भोसले (बहुजन वंचित आघाडी), विकास मारुती रोकडे (अपक्ष), शितल भारत ससाणे (अपक्ष), मोहम्मद हयात मो. हुसेन (पीस पार्टी), अहमद शकिल सगीर अहमद शेख (बहुजन समाज पार्टी), अनिता किरण पाटोळे (अपक्ष), राजू साहेबराव दळवी (अपक्ष), योगानंद नाडार (आपकी अपनी पार्टी), हेमंतकुमार गंगाराम बद्दी (बहुजन मुक्ती पार्टी), दिपक भागोजी कांबळे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया)
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा -
अॅड. रामचंद्र एन. कच्छवे (क्रांतिकारी जयहिंद सेना), अॅड. साहिल लक्ष्मीचंद शहा (भारतीय मानवाधिकार फेडरेल पार्टी, अब्बास अेफ. छत्रीवाला (जन अधिकार पार्टी), अरविंद गणपत सावंत (शिवसेना), मिलिंद मुरली देवरा (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), शंकर गंगाधर सोनवणे (अपक्ष), हमीर कालिदास विजुंडा (बहुजन रिपब्लीकन सोशॅलिस्ट पार्टी), सुरेशकुमार मिस्त्रीलाल गौतम (बहुजन समाज पार्टी), डॉ. अनिलकुमार भुबनेश्वर चौधरी (वंचित बहुजन आघाडी), इरफान शेख (आंबेरकराईट पार्टी ऑफ इंडिया), साई श्रीवास्तव (अपक्ष), राजेश बी. दयाल (अपक्ष), सेहबाज राठोड (जय महा भारत पार्टी) अशी माहिती मुंबई शहर जिल्हा प्रसिध्दी माध्यम कक्षामार्फत देण्यात आली आहे.