ETV Bharat / state

दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईन घ्यावी; ग्रामीण विद्यार्थ्यांची मागणी

author img

By

Published : Apr 7, 2021, 7:18 PM IST

राज्यात जाहीर केलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच आता ग्रामीण विद्यार्थ्यांच्या पालकांनी दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आलेली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई - राज्यात जाहीर केलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच आता ग्रामीण विद्यार्थ्यांच्या पालकांनी दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आलेली आहे.

ऑनलाइन परिक्षेने ग्रामीण विद्यार्थ्यांचे नुकसान होणार

महाराष्ट्रात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या तरी या रोगाचे प्रमाण ग्रामीण भागामध्ये कमी आहे. परंतु भविष्यात ग्रामीण भागातील रुग्णाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरी भागातून अनेक कामगार स्थलांतर करत आहेत. त्याबरोबर त्यांचे कुटुंबिय आपल्या गावी जात आहेत . यामुळे ग्रामीण भागात पुढील काळात कोरोना रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणूनच वेळेवर परीक्षा व्हावी, असा सूर काही लोक व्यक्त करत आहेत. आयसीआयसी, सीबीएससी आणि आयबी बोर्ड यांच्या परीक्षा मात्र वेळेवर होत आहेत. त्यामुळेच भविष्यात होणाऱ्या अनेक स्पर्धात्मक परीक्षेत राज्यातील मुले नक्कीच मागे पडणार. अनेक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जाण्याची इच्छा असते व पुढील व्यावसायिक अभ्यासक्रम या दृष्टीने राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास याला जबाबदार कोण, अशी प्रश्न उपस्थित केला जात आहे.

इंटरनेट समस्यांमुळे परीक्षा ऑफलाइन घ्या

महाराष्ट्रातील अनेक शााळांमध्ये व खेड्या-पाड्यांत संगणक सुविधा व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. यामुळे अनेक तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात. यासाठी शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तुलना न करता परीक्षा ऑफलाइन घ्यावी, अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा - मुंबई महापालिका कार्यालयात कर्मचाऱ्यांना लसीकरण, आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.