मुंबई - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खासदारकीचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर सत्ताधारी आमदारांनी विधिमंडळात आंदोलन केले. दरम्यान राहुल गांधी यांच्या प्रतिमेला भाजप आणि शिंदे गटाचे आमदारांनी जोडे मारले. विधानभवनात याचे तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी जोडे मारणाऱ्या आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित विषयांवर आज निवेदन करणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे आमदार यांना दिले होते. या संदर्भात आघाडीचे आमदारांनी आज सकाळी अध्यक्षांची भेट घेऊन विचारणा केली असता, अध्यक्षाकडून कारवाई करण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
सरकारचा एककलमी कार्यक्रम - आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीने अधिवेशन काळात शेवटपर्यंत कामकाजात भाग घेतला. शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत मदत कशी देता देईल यासाठी प्रयत्न केला. अधिवेशन काळात राष्ट्रीय नेत्यांना जोडे मारण्याचा प्रकार झाला. सभागृहाची प्रथा आणि परंपरा नाही. विधिमंडळाचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. तरीही विधिमंडळ परिसरात तीव्र शब्दांत निषेध केला. कोणत्याच राष्ट्रीय नेत्याच्या बाबतीत घडू नये. ज्या आमदारांनी जोडे मारले त्यांना निलंबित करावे, अशी भूमिका घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे बैठक घेतली त्यांनी आज निर्णय देणार असल्याचे सांगितले. दरम्यान, सभागृहात ज्या ज्या गोष्टी घडल्या. अपमानास्पद शब्द वापरले गेले. संबंधितांवर कारवाई करून विधिमंडळाने अंकुश ठेवावा अशी मागणी केली मात्र अध्यक्षांचा कल योग्य दिसला नाही, असे अजित पवार यांनी म्हणाले.
अजित पवार आक्रमक - तसेच, मराठा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ दिला नाही. एक ओळीचा प्रस्ताव दिला. मराठावाड्यावर यामुळे अन्याय होईल. त्यामुळे चर्चा करायची नसल्यास दोन दिवसांचे अधिवेशन घ्या. मात्र, मुख्यमंत्र्यांनी नकार देत समिती नेमल्याच सांगितले. उलट तत्कालीन सरकारने ठाकरे मुख्यमंत्री असताना समिती नेमली होती. सकारात्मक गोष्टींवर सरकारला बोलायला वेळ नाही. त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.
पायताने आमच्याकडे सुद्धा - विधानभवनात आंदोलन कसे असावे याचे नियम घालून दिले आहेत. परंतु, दुर्दैवी अशी कृती सत्ताधाऱ्यांकडून झाली. हा प्रकार निषेधार्थ आहे. आज सरकार असले तरी आमच्याकडे पायताने आहेत, हे विसरू नका, असा इशारा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला. कारवाईबाबत आज निर्णय देण्याचे विधानसभा अध्यक्षानी ठरवले. त्यानुसार निरपेक्ष राहून निर्णय घ्यायला हवा होता. मात्र, अध्यक्ष टाळाटाळ करत असल्याचे थोरात यांनी सांगत सरकारच्या मराठवाडा मुक्तीसंग्रामबाबत भूमिकेवर टीका केली.
लोकशाही, संविधान आणि न्याय हक्कासाठी लढणार - अधिवेशन सुरू झाल्यापासून आम्ही सभागृहाचे कामकाज योग्य पद्धतीने करत आहोत सभागृह बंद पडलेले नाही. राज्यातील जनतेला न्याय मिळायला हवा, हा यामागचा हेतू होता. परंतु हे सरकार योग्य निर्णय घेत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदी नेत्यांकडून नव्या आमदारांना विधिमंडळाची कार्यपद्धती सांगत असतात. आंदोलने कशा रीतीने व्हायला हवे, हे देखील सांगतात. मात्र,
3
त्यादिवशी सत्ताधाऱ्यांकडून धक्कादायक प्रकार घडला. विरोधक नेहमीच प्रोटोकाल आणि आचारसंहिता पाळत आले आहेत. परंतु, सभागृह आणि बाहेर सत्ताधारी कसेही वागतात. आमदारांकडून धमकावले जाते गोळीबार केला जातो. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी निरापराध लोकांवर गुन्हे, खटले चालवले जातात. लोक प्रतिनिधी हे महाराष्ट्राचे आवाज असून जनतेचे प्रतिनिधित्व करतात. सत्ताधाऱ्यांमधील अशा आमदारांची कामगिरी निंदनीय आहे. अध्यक्षांकडून त्यावरती कारवाई करण्याची त्यांना पाठीशी घातले जाते. अध्यक्ष हे सर्वांचे आहेत केवळ भाजपचे नाही, असा इशारा युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिला. तसेच महाविकास आघाडी संविधान, लोकशाही आणि न्याय हक्कासाठी आता लढत राहील, असेही ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - Rahul Gandhi Disqualification : माफी मागायला मी सावरकर नाही -राहुल गांधी