ETV Bharat / state

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे मुंबई पोलिसांची कोट्यवधींची थकबाकी - mca owes mumbai police

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत वानखडे स्टेडियम येथे २०१३ ते २०२० पर्यंत विविध आंतरराष्ट्रीय कसोटी, एकदिवसिटी व टी-२० सामने भरविण्यात आले होते. या सामान्यांसाठी मुंबई पोलिसांकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनने पोलीस सुरक्षेची मागणी केली होती. मुंबई पोलिसांनी या सामन्यांसाठी पोलीस बंदोबस्त देऊन त्यासाठी शुल्क लागू केले होते.

rti-reveals-mca-owes-mumbai-police-rs-14-82-crore-for-security
मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे मुंबई पोलिसांची कोट्यवधींची थकबाकी
author img

By

Published : Jul 21, 2020, 12:44 PM IST

मुंबई - देशात नावाजलेले क्रिकेट असोसिएशन म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशन ओळखले जाते. मात्र, मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई पोलिसांचे १४ कोटी ८२ लाखांचे देणे अद्याप फेडले नसल्याची माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्याकडून ही माहिती समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनला मुंबईतील वानखडे स्टेडियम वर झालेल्या वेगवेगळ्या क्रिकेट सामन्याच्या वेळेस पोलीस सुरक्षा देण्यात आली होती. यासाठी आकारण्यात आलेले १४ कोटी ८२ लाखांचे शुल्क मुंबई पोलिसांनी तब्बल ३० वेळा रिमाइंडर पाठवूनही मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप भरलेले नाही.

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे मुंबई पोलिसांची कोट्यवधींची थकबाकी
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत वानखडे स्टेडियम येथे २०१३ ते २०२० पर्यंत विविध आंतरराष्ट्रीय कसोटी, एकदिवसिटी व टी-२० सामने भरविण्यात आले होते. या सामान्यांसाठी मुंबई पोलिसांकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनने पोलीस सुरक्षेची मागणी केली होती. मुंबई पोलिसांनी या सामन्यांसाठी पोलीस बंदोबस्त देऊन त्यासाठी शुल्क लागू केले होते.

१) २०१३ साली महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या सामन्यांसाठी पोलीस सुरक्षेचे ६ कोटी ६६ लाख २२ हजार रुपये

२ ) नोव्हेंबर २०१५ मध्ये खेळविण्यात आलेले ३ एकदिवसीय सामन्यांचे ८३ लाख ५२ हजार रुपये

३) २०१६ मध्ये ५ टी-२० सामन्यांचे ३ कोटी ६० लाख रुपये

४) डिसेंबर २०१६ मध्ये भरविण्यात आलेल्या कसोटीचे ५० लाख

५ ) फेब्रुवारी २०१७ मधील सर्व सामन्यांचे ५० लाख रुपये

६) मे २०१७ साली खेळविण्यात आलेल्या आयपीएलचे ६६ लाख रुपये

७) ऑक्टोंबर २०१७ मध्ये भरविण्यात आलेल्या एक दिवसीय सामन्याचे ६६ लाख रुपये

८) डिसेंबर २०१७ मध्ये टी-२० सामन्याचे ६६ लाख रुपये

९) मे २०१८ मध्ये आयपीएल सामन्यांचे १ कोटी ४० लाख रुपये

१०) ऑक्टोंबर २०१८ साली खेळविण्यात आलेल्याला एक दिवसीय सामन्याचे ७५ लाख रुपये

डिसेंबर २०१९ च्या टी-२० व १४ जानेवारी २०२० रोजीच्या एक दिवसीय मालिकेचे पोलीस बंदोबस्त सुरक्षेच्या शुल्काचे अजूनही शासन आदेश प्राप्त झालेले नसल्याने नमूद शुल्कात आणखीन भर पडणार आहे. मुंबई पोलिसांकडून पाठविण्यात आलेल्या शुल्काची अजूनही वसूली न झाल्याने या बाबत अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री व गृह मंत्र्यांना पत्र पाठवून यात लक्ष देण्याची मागणी केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून जर शुल्क भरले जात नसेल तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांची संपत्ती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जप्त करुन पैसे वसूल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.