ETV Bharat / state

आरपीएफ जवानाने गर्भवती महिलेला दिले जीवनदान; दादर रेल्वे स्थानकातील घटना - Pregnant woman saved dadar railway station

धावत्या रेल्वे गाडीत चढणारी गर्भवती महिला आणि तिच्या मुलाचे प्राण एका आरपीएफ पोलिसाने वाचवले आहे. ही घटना मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात घडली. गर्भवती महिला तिच्या मुलासह धावत्या रेल्वे गाडीत चढत असताना तिचा तोल सुटला व ती फलाट आणि रेल्वेच्या मध्याभागी असलेल्या पोकळीत पडत होती, मात्र आरपीएफ कॉन्स्टेबल अशोक यादव यांनी वेळीच मदत केल्याने महिला व तिच्या मुलाचे प्राण वाचले.

Pregnant woman saved dadar railway station
प्राण बचावले गर्भवती महिला दादर रेल्वे स्थानक
author img

By

Published : May 4, 2021, 8:02 PM IST

मुंबई - धावत्या रेल्वे गाडीत चढणारी गर्भवती महिला आणि तिच्या मुलाचे प्राण एका आरपीएफ पोलिसाने वाचवले आहे. ही घटना मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात घडली. गर्भवती महिला तिच्या मुलासह धावत्या रेल्वे गाडीत चढत असताना तिचा तोल सुटला व ती फलाट आणि रेल्वेच्या मध्याभागी असलेल्या पोकळीत पडत होती, मात्र आरपीएफ कॉन्स्टेबल अशोक यादव यांनी वेळीच मदत केल्याने महिला व तिच्या मुलाचे प्राण वाचले. यादव यांच्या कार्याचे समाज माध्यमावर कौतुक होत आहे. ही घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

घटनेचे दृष्य

हेही वाचा - 'प्रकाश जावडेकरांनी महाराष्ट्राची माफी मागावी'

अशी घडली घटना

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोमावरी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास दादर रेल्वे स्थानकाच्या प्लाटफॉर्म क्रमांक ५ वर ट्रेन क्रमांक 01091 सीएसएमटी- दानापूर एक्स्प्रेस आली. ती आपल्या नियोजित वेळेत स्थानकावरून पुढच्या प्रवासाला रवाना होत होती, यादरम्यान एका गर्भवती महिलेने आपल्या लहान मुलासह धावत्या ट्रेनमध्ये बसण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या महिलेचा तोल गेल्याने ती फलाट आणि रेल्वे गाडीमधील असलेल्या पोकळीत पडत असताना इतक्यात कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवान अशोक यादव यांनी समयसूचकता दाखवून ट्रेनकडे धाव घेतली व गर्भवती महिला आणि मुलाला पकडून बाजूला केले. त्यामुळे, आई आणि मुलाचे प्राण वाचले. अशोक यादव यांच्या धाडसी कामाची दखल आरपीएफ मध्य रेल्वे प्रशासन यांच्याकडून घेण्यात आली आहे.

गर्भवती महिलेने मानले आभार

गर्भवती महिलेचे नाव शोभा कुमारी असून ती बिहारची रहिवासी आहे. शोभा आपल्या मुलाला घेऊन दादर ते दानापूरला जात होती. मात्र, रेल्वे स्थानकावर उशिरा पोहचल्यामुळे शोभाने धावत्या गाडीत बसण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने आरपीएफ जवान अशोक यादव यांच्या प्रसंगावधानाने शोभाचे यांचे प्राण वाचले. शोभा यांनी आरपीएफ पोलिसांचे आभार मानले आहे.

रेल्वे सुरक्षा दलाने सांगितले की, आमचे आरपीएफ कर्मचारी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर आणि सर्तक असतात. अनेकदा आपला जीव धोक्यात घालून आजपर्यंत शेकडो प्रवाशांचे प्राण त्यांनी वाचवले आहेत. अशोक यादव यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका महिला प्रवाशाचा जीव वाचला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन रेल्वेकडून त्यांच्या सत्कार करण्यात येईल.

सीसीटीव्ही कॅमेरात घटना कैद

ही संपूर्ण घटना दादर रेल्वे स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच, आरपीएफ कॉन्स्टेबल अशोक यादव यांनी प्रसंगावधान दाखवत या प्रवाशांचे प्राण वाचवले, त्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. प्रवाशांना सुरक्षित ठेवणे हे आमचे काम आहे. मला हे काम करत असताना समाधान वाटते. प्रवाशांनी धावती ट्रेन पकडू नये, असे आवाहन अशोक यादव केले.

हेही वाचा - मुंबईकरांना मोफत आणि त्वरित लस द्या; भाजपा नगरसेवकांची महापौर दालनाबाहेर निदर्शने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.