मुंबई Rohit Pawar on Nanded Case : नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील मृत्यूप्रकरणी अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावरून आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. काल रात्री उशिरा अधिष्ठातांवर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
-
नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनवर दाखल झालेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रकार आहे... डीन यांचा हलगर्जीपणा असेल तर कारवाई झाली पाहीजे पण पुरेसा औषध पुरवठा करण्यात अपयशी ठरल्याबद्दल संबंधित विभागाचे मंत्री आणि सरकार यांच्यावर कोण आणि काय…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनवर दाखल झालेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रकार आहे... डीन यांचा हलगर्जीपणा असेल तर कारवाई झाली पाहीजे पण पुरेसा औषध पुरवठा करण्यात अपयशी ठरल्याबद्दल संबंधित विभागाचे मंत्री आणि सरकार यांच्यावर कोण आणि काय…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 5, 2023नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनवर दाखल झालेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रकार आहे... डीन यांचा हलगर्जीपणा असेल तर कारवाई झाली पाहीजे पण पुरेसा औषध पुरवठा करण्यात अपयशी ठरल्याबद्दल संबंधित विभागाचे मंत्री आणि सरकार यांच्यावर कोण आणि काय…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 5, 2023
रोहित पवारांचं ट्विट काय : 'नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनवर दाखल झालेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा म्हणजे आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रकार आहे. डीन यांचा हलगर्जीपणा असेल तर कारवाई झालीच पाहिजे. पण, पुरेसा औषध पुरवठा करण्यात अपयशी ठरल्याबद्दल संबंधित विभागाचे मंत्री आणि सरकार यांच्यावर कोण आणि काय कारवाई करणार? केवळ डीनवर गुन्हा दाखल करून सरकारला आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलता येणार नाही', असं ट्विट करत आमदार रोहित पवारांनी राज्य सरकारवर हल्ला केलाय.
नेमकं प्रकरण काय : नांदेडच्या विष्णुपूरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरांवर काल रात्री सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकीच्या मृत्यू प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी कामाजी टोंपे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. त्यांचे नातेवाईक रुग्णालयात भरती असताना त्यांना बाहेरुन ४० हजारांहून अधिकची औषधे खरेदी करण्यास त्यांनी भाग पाडलं. तसंच रक्त व इतर तपासण्यासाठीही पैसेही खर्च करावे लागले. अधिष्ठाता डाॅ. एस आर वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर यांनी उपचाराकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय.
हेही वाचा :
- Nanded Hospital Death Case : मोठी बातमी! नांदेड मृत्यूप्रकरणात अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल
- MP Hemant Patil on FIR : 'या' कारणामुळे मी आणि अधिष्ठातांनी स्वच्छतागृह केलं साफ, खासदार हेमंत पाटलांच स्पष्टीकरण
- Dharashiv Death News : आरोग्यमंत्र्यांच्या मतदार संघातच आरोग्यसेवेचे तीनतेरा; ऑक्सिजनअभावी चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप