ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम; अपघाताचे प्रमाण घटले - कोरोना व्हायरस बातमी

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी संचारबदी सह लाॅकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प आहे. परिणामी, रस्त्यांवर प्रचंड शुकशुकाट असून एखाद-दोन वाहनेच दृष्टीस पडत आहेत. यामुळे राज्यातील रस्ते अपघाताचा आलेख खाली आला आहे.

road-accident-rate-decreased-due-to-corona-lockdawn-in-maharastra

author img

By

Published : Apr 12, 2020, 1:59 PM IST

मुंबई- राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी संचारबदीसह लाॅकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प आहे. परिणामी, रस्त्यांवर प्रचंड शुकशुकाट असून एखाद-दोन वाहनेच दृष्टीस पडत आहेत. यामुळे राज्यातील रस्ते अपघाताचा आलेख खाली आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने राज्यातील कमी झालेल्या अपघाताचा आढावा घेतला आहे.

  • जळगाव जिल्ह्यातील मोठ्या अपघातांचे प्रमाण जवळपास शून्यावर...

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनचे सर्वच घटकांवर विपरित परिणाम होत असले तरी काही बाबतीत त्याचे सकारात्मक परिणाम देखील पाहायला मिळत आहेत. लॉकडाऊनच्या काळात जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघातात प्रचंड घट झाली आहे. जिल्ह्यातील मोठ्या अपघातांचे प्रमाण जवळपास शून्यावर आले आहे. संचारबंदीच्या काळात जळगाव जिल्ह्यात केवळ एकच मोठा अपघात झालेला आहे. तो अमळनेर तालुक्यातील झाडी गावाजवळ 3 दिवसांपूर्वी घडला होता. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांना जेवण मिळत नाही. अशा लोकांना अन्नदान करून घरी परतणाऱ्या तरुणांची रिक्षा उलटल्याने 2 तरुण जागीच ठार झाले होते. हा अपघात वगळता मोठा अपघात झालेला नाही.

road-accident-rate-decreased-due-to-corona-lockdawn-in-maharastra
मोकळ्या रस्त्याने अपघाताचे प्रमाण घटले
  • एक दिवसाआड रस्ते अपघातात कुणाचा तरी जीव जायचा...

एरवी जिल्ह्यातील रोजच्या अपघाताची आकडेवारी १५ ते २० च्या घरात आहे. विशेष म्हणजे, एक दिवसाआड रस्ते अपघातात कुणाचा तरी जीव जातो. मात्र, संचारबंदीत अपघाताच्या घटना थांबल्या आहेत. रस्त्यावर फिरायला निर्बंध असल्याने अनावश्यक वाहने रस्त्यावर दिसतच नाही. त्याशिवाय दारुची दुकाने बंद आहेत. मद्याच्या नशेत अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात, त्या थांबल्या आहेत.

22 मार्चपासून जळगाव जिल्ह्यात अपवाद वगळता एकही मोठा अपघात झालेला नाही. दुचाकींचे किरकोळ स्वरूपाचे अपघात काही ठिकाणी घडले आहेत. परंतु, त्यांची जिल्हा वाहतूक शाखेकडे नोंद नाही.

जळगाव शहर वाहतूक शाखेत प्रभारी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे 90 जणांचा स्टाफ आहे. त्यात 1 पोलीस निरीक्षक, 1 सहायक पोलीस निरीक्षक यांच्यासह 80 ते 85 पोलीस कर्मचारी आहेत. यापैकी 12 ते 15 कर्मचारी हे वाहतूक शाखेचे प्रशासकीय काम सांभाळतात. तर उर्वरित अधिकारी आणि कर्मचारी शहरातील विविध भागात वाहतूक नियमनाचे काम पाहतात.

अपघाताचा आखेल खाली
  • दंडात्मक कारवाईतील दंड संकलन कमी...

जळगाव शहरात जवळपास 15 ते 20 प्रमुख चौक आहेत. त्यापैकी 18 चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा आहे. प्रत्येक चौकात 3 ते 4 कर्मचारी वाहतूक व्यवस्था पाहतात. सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू असल्याने खासगी वाहतुकीला प्रतिबंध आहे. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या अगदी तुरळक आहे. म्हणून शहरातील सिग्नल यंत्रणा बंद केली आहे. मात्र, खबरदारी म्हणून प्रमुख चौकात नाकाबंदी, बॅरिकेटिंग करण्यात आली असून वाहनांच्या तपासणीसाठी 3 ते 4 पोलीस कर्मचारी नेमणुकीस आहेत. लॉकडाऊन असताना, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. लॉकडाऊनमुळे दंडात्मक कारवाईतील दंड संकलन कमी झाले आहे.

अपघातचे प्रमाण घटले
  • सीसीटीव्हीतून पोलिसांची नजर...

दरम्यान, शहरातील काही प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्याने त्यामाध्यमातून पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षातून वाहतुकीवर नजर ठेवली जात आहे. वाहतूक नियमनाचा फारसा भार नसल्याने शहर वाहतूक शाखेतील 35 कर्मचारी हे जिल्ह्यात ठिकठिकाणी सीमा सुरक्षा आणि नाकाबंदीच्या कर्तव्यावर आहेत, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांनी दिली.

  • मुंबईत 4 एन्ट्री पाईंटवर नाकाबंदीने, अपघाताचे प्रमाण 1 टक्क्यांवर...

लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील पॉईंट दहिसर, मुलुंड, ऐरोली, वाशी येथील 4 एन्ट्री पाईंटवर मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा सोडल्यास इतर कुठल्याही वाहनांना मुंबईतील रस्त्यावर किंवा मुंबईत प्रवेश देण्यात आलेला नाही. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर वाहन धावत नसल्याने अपघातांचे प्रमाण 1 टक्क्यांवर आले आहे. मुंबईत संचारबंदीच्या काळात कलम 188 नुसार अवैद्य वाहतूक करणाऱ्या 483 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

महामार्गही झाले मोकळे
  • दिवसाला नागपुरात सरासरी दोन ते ५ पाच लोकांचा जीव जायचा..

राज्यात आणि देशात लॉकडाऊन घोषित झाल्यापासून नागपूर शहरात आणि जिल्ह्यात एकही मोठ्या अपघाताची नोंद नागपूर पोलिसात झाली नाही. ऐरवी नागपूर पोलिसांत दाखल अपघाताच्या घटनामंध्ये दिवसाला सरासरी दोन ते ५ पाच लोकांचा जीव रस्ते अपघातात जायचा. मात्र, आता रस्त्यांवर वाहनांना बंदी घालण्यात आल्यापासून अपघातांची मालिका खंडित झाली आहे. शिवाय शहरात जागोजागी ओव्हर स्पीड मीटर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांच्या स्पीडला ब्रेक लागलेला आहे. त्यामुळे अपघाताची संख्या कमी झाली आहे.

  • चौकाचौकात पोलिसांचा फौज फाटा तैनात...

तर कोरोना बंदोबस्तामुळे शहराच्या चौकाचौकात पोलिसांचा फौज फाटा तैनात असल्याने, वाहन चालक पोलिसांच्या भीतीपोटी वाहन रस्त्यांवर आणायला घाबरत असल्याने देखील अपघात होणे थांबलेले आहेत. कोरोनामुळे का होईना शहरातील अपघातांची मालिका थांबल्याने शेकडो लोकांचा जीव आपसूकच वाचला आहे. नागपूर शहरात २० पेक्षा जास्त अपघात स्थळ आहेत. त्या ठिकाणी पोलीस विभागाकडून करण्यात आलेल्या सुधारणांमुळे देखील अपघातांचे प्रमाण घटले आहे. नागपूर शहरात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू झाल्यापासून नागपूरकरांनी शिस्तीत राहूनच घराबाहेर पडण्याचे टाळले आहे. काही बेजवाबदार नागरिक मात्र एका वाहनावर तिघांना घेऊन जीवघेणा प्रवास करत असल्याचे निदर्शनात आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. नागपूरकरांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केल्यानेच अपघातांची संख्या नगण्य झाली आहे

प्रचंड वर्दळीचे रस्तेही मोकळे
  • 'त्या' दोन घटना वगळता कोल्हापूरमध्ये एकही अपघात नाही....

लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून 2 घटना वगळता एकही इतर अपघाताची नोंद कोल्हापूर झाली नाही. लॉकडाऊनचे आदेश देताच ग्रामीण भागातील लोकांनी आपली गावं बंद केली होती. यामध्ये रस्त्यावरच मोठं मोठे दगड लावून मुख्य रस्ते बंद केले होते. याची माहिती नसल्याने त्यावर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात शाहूवाडी तालुक्यातील घुंगुर गावातील 24 वर्षीय तरुण कृष्णात दगडू पाटील जागीच ठार झाला होता. शिवाय अशाच पद्धतीची दुर्दैवी घटना कराड जवळ घडली. शाहूवाडी तालुक्यातील पती, पत्नी आणि त्यांच्या सहा वर्षांच्या मुलाला सुद्धा कराड जवळ आपला जीव गमवावा लागला. कोरोनाच्या धास्तीने मुंबईहुन परतताना, कोल्हापूरच्या शाहुवाडीतील एका पती, पत्नीसह एका सहा वर्षांच्या मुलाचा अपघात होऊन मृत्यू झाला होता. या घटना वगळता एकही अपघाताची नोंद कोल्हापुरात झाली नाही.

रस्तावरील वाहने गायब त्यामुळे अपघात कमी
  • पुर्वी महिन्याला नाशकात सरासरी 150 ते 200 अपघात व्हायचे...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉगडाऊन असून, अत्यावश्यक कामा व्यतिरिक्त नागरीकांना घरा बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच जिल्हा बंदी असल्याने बाहेरील जिल्ह्यातून तसेच राज्यातून शहरात येणारी वाहने कमी झाल्याने शहरातील सर्वच रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. याचा परिणाम रस्ते अपघातावर झाला असून शहरातील अपघाताच्या घटनांमध्ये तब्बल 90 टक्के घट झाली आहे. नाशिक शहरात महिन्याला सरासरी 150 ते 200 लहान मोठे अपघात होतात. ह्याची नोंद नाशिकच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात होत असते. मात्र सध्या लॉगडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता कुठलीच वाहने रस्त्यावर दिसत नाहीत. तसेच जिल्हा बंदीची पोलीस कडक अंमलबजावणी करत असल्याने इतर जिल्ह्यातून आणि परराज्यातून वाहन शहरात येत नसल्याने देखील अपघाताच्या घटनांवर थांबल्या आहेत.

रस्त्यावर वाहनांची गर्दी नाही..

दरम्यान, अपघात घटले असले, अपघातातील मृत्यूचे प्रमाण घटले असले तरी, कोरोनाचे नव-नवे रुग्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणीक समोर येत आहते. कोरोनाशी झुंज देत अनेकांचा मृत्यू होत आहे. पण काही नागरिकांनी अजूनही गंभीरता लक्षात घेतलेली दिसत नाही. घर सोडून नागरिक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरबाहेर न पडता. घरातच राहून काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.