मुंबई - सचिन वाझे यांचे सहकारी आणि एपीआय रियाजुद्दीन काझी यांना शनिवारी रात्री उशिरा एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. अँटीलिया कार स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणातील ही दुसरी अटक आहे. अटकेनंतर काझी यांना १६ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचे मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने निर्देश दिले आहे.
काझींच्या वकिलांचा कोर्टात दावा
रियाज काझी अधिकृतपणे आपली ड्युटी करत होते. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करत होते. त्यांनी केलेल्या सर्व कामांची नोंद पोलीस डायरीत केली जात असल्याचा दावा रियाज काझीच्या वकिलांचा कोर्टात केला आहे.
पुरावे नष्ट केल्याचा आरोप
अँटीलिया कार स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या कटात सहभागी असणे तसेच पुरावे नष्ट करणे, या आरोपाखाली रियाजुद्दीन काजी यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात रियाजुद्दीन काजी यांची तब्बल दहा ते बारा दिवस सुमारे दहा - दहा तास एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती.