मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा अमली पदार्थांच्या अनुषंगाने तपास करणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) न्यायालयात शुक्रवारी 12 हजारांहून अधिक पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रावर रिया चक्रवर्तीचे वकील अॅड सतीश माने-शिंदे यांनी टीका केली आहे. हे आरोपपत्र रियाला अडकवण्यासाठी तयार केले गेले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सुशांतसिंह राजपूत संबंधित अमली पदार्थ प्रकरणात केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने विशेष एनडीपीएस न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. अभिनेता रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ आणि इतर काहीजण या प्रकरणात आरोपी आहेत. मूळ 12 हजार पानाच्या आरोप पत्रात रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक तसेच अन्य 31 आरोपी आहेत. त्यात मुंबईतील काही अमली पदार्थ माफियांचा समावेश आहे. त्यापैकी रिया, शोविक, दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा आणि क्षितिज प्रसाद आहेत. या आरोपपत्रातून रियाला कसे अडकवता येईल यासाठी प्रयत्न केला गेला असल्याचे वकिलांनी सांगितले.
हेही वाचा - धक्कादायक..! वडील आणि आजोबांची हत्या करून तरुणाची आत्महत्या
33 आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मादक पदार्थांचे प्रमाण हे साधारण खटल्यांच्या तुलनेत काहीही नाही. एनसीबीचे वरपासून खालपर्यंत सर्व अधिकारी बॉलिवूड अमली पदार्थ प्रकरणाच्या शोध मोहिमेत गुंतली होती. तपासणी करताना एनसीबी ने चौकशी केलेल्या सेलिब्रिटींविरोधात असे कोणतेही पुरावे किंवा निष्कर्ष समोर आलेले नाहीत. ह्यांचे मला आश्चर्य वाटते का? एकतर आरोप खोटे होते किंवा सत्य ईश्वर जाणो. उच्च न्यायालयाने जामिनावर सुनावणी करताना कथित “फायनान्सिंग” ड्रग्स ट्रेडच्या बाबतीत कोणतीही प्राथमिक सामग्री मिळाली नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात एनसीबीने ड्रॅगशी संबंधित दोन गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक केली होती. परंतु, नंतर न्यायालयाने त्यांना जामिनावर मुक्त केले.
हेही वाचा - खासदार प्रज्ञा सिंह यांची प्रकृती गंभीर; एअर अॅम्युबलन्सने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल