ETV Bharat / state

Andheri East Bypoll : उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार; ऋतुजा लटकेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट - Court Ordered To Approve Resignation

उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणार ( Nomination form Uddhav Balasaheb Thackeray Party ) आहे. मला विश्वास आहे की माझे पती रमेश लटके यांनी केलेले काम आणि जनतेवर मला विश्वास आहे. त्यामुळे माझा विजय निश्चितच होणार आहे असे देखील ऋतुजा लटके यांनी म्हटले ( Rutuja Latke reaction on Nomination ) आहे.

Rituja Latke
ऋतुजा लटके यांनी उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
author img

By

Published : Oct 13, 2022, 4:43 PM IST

Updated : Oct 13, 2022, 6:03 PM IST

मुंबई : मला आशा होती मी पालिक कर्मचारी असल्याने पालिकेतून सहकार्य मिळेल मात्र तसे झाले नाही. म्हणून आज मला कोर्टात धाव घ्यावी लागली. माझा विरोधीत जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ज्यांनी केले त्यांना मी ओळखत नाही. मात्र मी राजीनामा दिल्यानंतर माझावर कुठलेही आरोप नाही कोणतिही चौकशी माझावर सुरू नाही असे पत्र मला पालिकेने दिलेले आहे. मला कोर्टावर विश्वास होता. मला न्याय मिळाला आहे. उद्या मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणार ( Nomination form Uddhav Balasaheb Thackeray Party ) आहे. मला विश्वास आहे की माझे पती रमेश लटके यांनी केलेले काम आणि जनतेवर मला विश्वास आहे. त्यामुळे माझा विजय निश्चितच होणार आहे असे देखील ऋतुजा लटके यांनी म्हटले ( Rutuja Latke reaction on Nomination ) आहे.

ऋतुजा लटके यांनी उद्धव ठाकरे यांची घेतली भेट - दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ऋतुजा लटके यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली आहे. सध्या अंधेरीची पोटनिवडणूक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. ऋतुजा लटके या उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

  • Rutuja Latke, ShivSena (Uddhav Balasaheb Thackeray) candidate for the Andheri East bypoll, met party chief Uddhav Thackeray in Mumbai, after the Bombay High court decision. pic.twitter.com/7OkENVJnXT

    — ANI (@ANI) October 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राजीनामा मंजूर करण्याचे न्यायालयाचे निर्देश : लटके यांचा राजीनामा उद्या 11 वाजेपर्यंत मंजूर करावा असे न्यायालयाने पालिकेला निर्देश ( Court Ordered To Approve Resignation) दिले. आज कोर्टात या प्रकरणी जोरदार युक्तीवाद झाला. त्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला.

ऋतुजा लटके

काय झाला युक्तीवाद - ऋतुजा लटके यांच्या याविरोधात गंभीर तक्रारी आल्या आहेत. म्हणून अद्याप राजीनामा मंजूर केलेला नाही असे पालिकेने आज कोर्टात सांगितले. या भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत( Corruption Complaint Against Rutuja Latke ) असेही पालिकेच्या वकिलांनी कोर्टात स्पष्ट केले. ऑक्टोबर महिन्यात दाखल तक्रार प्रलंबित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अंधेरीच्या एका व्यक्तीची तक्रार असल्याची माहितीही देण्यात आली. त्यावर ऋतुजा लटके यांचे वकील विश्वजित सावंत यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. निवडणूक लढू न देण्यासाठी म्हणून प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचा त्यांनी आरोप केला.

राजीनामा पालिकेने अजून मंजूर केलेला नाही - दुसरीकडे ऋजुता लटके यांचा राजीनामा पालिकेने अजून मंजूर केलेला नाही. राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्याचे म्हणणे आणि प्रशासनाकडे असलेली माहिती यांची पडताळणी केली जाते. एक महिना कालावधीत याबाबत चौकशी केल्यानंतर राजीनाम्याबाबत प्रशासन निर्णय घेते. त्यांचे अधिकृत राजीनामा पत्र 3 ऑक्टोबरला मिळाले आहे. त्यात दाखल एका तक्रारीची पडताळणी अद्याप बाकी आहे. बीएमसीचे वकील अनिल साखरे यांनी ही माहिती कोर्टाला दिली. ऋतुजा लटके यांनी राजीनामा पाठवला असला तरी त्यांनी काहीही संवाद प्रशासनाशी केला नाही. 3 ऑक्टोबरला राजीनामा दिला. त्यानंतर 12 ऑक्टोबरला ऋतुजा यांच्या विरोधात एक व्यक्तीने तक्रार केली आहे असे साखरे म्हणाले.

आयुक्तांचा विशेषाधिकार - नोटीस कालावधी माफ करून राजीनामा स्वीकारायचा की राजीनामा नाकारायचा हा सर्वस्वी पालिका आयुक्तांचा विशेषाधिकार आहे. या प्रकरणात राजीनामा पत्रही सदोष आहे. शिवाय आता तक्रार आली आहे. तर त्याचीही शहानिशा करून ते प्रकरण आधी बंद करावे लागेल. त्यानंतरच राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल. असे वकिलांनी स्पष्ट केले.

कायदा सर्व कर्मचाऱ्यांना समान असावा - ऋतुजा लटके यांचे वकील वकील विश्वजित सावंत यांनी बीएमसीच्या वकिलांच्या दाव्यांवर आपला जोरदार युक्तीवाद केला. हेमांगी वरळीकर यांचा राजीनामा पालिका प्रशासनाने मंजूर केला होता. तेव्हाही कालावधी अत्यंत कमी होता. कायदा सर्व कर्मचाऱ्यांना समान असावा असे ते म्हणाले. हेमांगी यांना वेगळा आणी ऋजुता यांना वेगळा न्याय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केवळ राजकीय दबाव असल्याने राजीनामा मंजूर केला जात नाही असा आरोप त्यांनी केला. आता ही नवीन तक्रार आली आहे असे सांगण्यात येत आरहे. त्यामध्ये तक्रारदार अंधेरीचा आणि त्याचा वकील पनवेलचा आहे. यामागील कारणे खरी मानायची का, असेही ते म्हणालेत.

Last Updated : Oct 13, 2022, 6:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.