मुंबई - ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे ३० एप्रिल रोजी निधन झाले. लॉकडाऊनमुळे त्यांच्या अंत्यविधीला अनेक जण हजर राहू शकले नाहीत. मात्र, सर्व बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋषी यांना श्रद्धांजली वाहिली. कपूर परिवाराने सर्वांसाठी घरीच प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. यातील काही छायाचित्रे समोर आली आहेत.
छायाचित्रात ऋषी यांच्या पत्नी नीतू आणि मुलगा रणबीर हार घातलेल्या फोटोसमोर बसेलेले दिसून येत आहेत. दोघांचे चेहरे गंभीर दिसत आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऋषी कपूर अनेक काळापासून कॅन्सरने ग्रस्त होते. २९ एप्रिलला अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या चर्चा सुरू झाल्या. अशातच दुसऱया दिवशी म्हणजे ३० एप्रिलला ऋषी यांच्या निधनाच्या बातमीमुळे सर्वांना मोठा धक्काच बसला.