मुंबई : भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत याला मुंबईत अंधेरी येथे असलेल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी काल सायंकाळी दाखल करण्यात आला आहे. काल सायंकाळी रिषभ पंत ( Cricketer Rishabh pan ) याला देहरादून वरून एअरलिफ्ट करून मुंबई पुढील उपचारासाठी आणण्यात आले. ( Rishabh Pant Health Condition ) गुडघा आणि पायावरील दुखापती वर पुढील उपचार होणार असून रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यावर ऑर्थोपेडिक सर्जन दिनशॉ पारदिवाला यांच्या सेंटर ऑफ स्पोर्ट मेडिसिन टीम अंतर्गत देखरेखीखाली लवकरच लिंगामेट सर्जरी होणार आहे. (Rishabh Pant Health Updates)
ऋषभ पंतला जबर दुखापत : अद्याप ही सर्जरी कधी केली जाईल याबाबत अधिकृत माहिती हॉस्पिटल प्रशासन किंवा बीसीसीआय कडून देण्यात आलेली नाही. मात्र काल ऋषभ पंत याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर काही प्राथमिक चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर लिगामेंट सर्जरी डॉक्टरांकडून केली जाणार आहे. 30 डिसेंबरला शुक्रवारी रात्री दिल्लीहून उत्तराखंड येथे असलेल्या आपल्या घरी जात असताना ऋषभ पंत याच्या गाडीचा अपघात झाला. यावेळी ऋषभ पंत स्वतः आपली गाडी चालवत होता. या अपघातात ऋषभ पंतला जबर दुखापत झाली. ऋषभ पंत याच्यावर आतापर्यंत देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
पुढील उपचार कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मध्ये : मात्र ऋषभ पंत याच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली असल्याने लिगामेट सर्जरीसाठी ऋषभ पंत याला पुढील उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. ऋषभ पंत याला एअरलिफ्ट करून मुंबईला उपचारासाठी आणण्यात आले. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मध्ये डॉ. दीनशॉ पारदिवाला हे ऋषभ पंत यांच्यावर पुढील उपचार करणार आहेत. त्यांच्या देखरेखीखाली एक टीम रिषभ पंत याचा पुढील उपचार करेल. (Rishabh Pant Accident)
ऋषभ पंत याच्यावर लिंगामेन्ट सर्जरी : मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात ( Kokilaben Dhirubhai Ambani Hospital ) दाखल केल्यानंतर ऋषभ पंत याच्या काही चाचण्या करण्यात आल्या. यानंतर ऋषभ पंत याच्यावर लिगामेन्ट सर्जरी कधी केली जाणार याबाबत निश्चित केले जाणार आहे. बीसीसीआय कडून ऋषभ पंत याच्या उपचारावर देखरेख ठेवण्यात येत आहे. ऋषभ पण त्यांच्या आरोग्याबाबत मिळालेला प्राथमिक माहितीनुसार ऋषभ पंत याला पूर्णपणे ठीक व्हायला जवळपास सहा ते सात महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे एवढा वेळ ऋषभ पंत याला क्रिकेट पासून दूर राहावे लागणार आहे.