ETV Bharat / state

CM Eknath Shinde : तब्बल 2 कोटी चहावर खर्च; मुख्यमंत्री म्हणाले, माझ्याकडे येणारे लोक सोन्यासारखे - Chief Minister Eknath Shinde criticized opposition

राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात चौफेर टोलेबाजी करत विरोधकांना चिमटे काढले. राज्य सरकार करीत असलेल्या कामांची यादी त्यांनी यावेळी वाचली. तसेच प्रस्तावित प्रकल्पांची, कामांची माहिती त्यांनी सभागृहात दिल्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाचा ठराव मंजूर करण्यात आला.

Eknath Shinde On Governor Address
Eknath Shinde On Governor Address
author img

By

Published : Mar 3, 2023, 6:27 PM IST

मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेचा आजचा शेवटचा दिवस होता. राज्यपालांच्या अभिभाषणावर सत्ताधारी पक्षाकडून अनेक सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच त्यांनी अभिनंदन ठरावाला समर्थन दिले, तर विरोधी पक्षाकडून सरकारच्या विविध कामातील उनिवा, दोष दाखवत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत अभिनंदन प्रस्तावाला विरोध केला. या सर्व चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेला उत्तर दिले.

राष्ट्रद्रोही म्हणणे योग्य का? मुख्यमंत्री : आपण देशद्रोही शब्दाचा उच्चार केल्याबद्दल सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र, तत्पूर्वी विरोधकांनी चहापानाला बहिष्कार टाकताना सरकार राष्ट्रदोही असल्याचे म्हटले होते. सरकारला राष्ट्रद्रोही म्हणणे कितपत योग्य आहे. हे आधी अजितदादांनी स्पष्ट करावे. मी एका व्यक्तीच्या संदर्भात देशद्रोही हा उच्चार केला होता. सर्व सदस्यांसाठी नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात दिले.

आम्ही चांगले काम करीत आहोत : राज्य सरकार अतिशय चांगले काम करीत असून विरोधकांना केवळ विरोध करायचा आहे. परंतु विरोधकांचा कितीही विरोध असला तरी, सरकार काम करीत राहणार अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. या सरकारने मुंबई ट्रान्स हार्बर शिवडी ते नावाशेवा हा 22 किलोमीटरचा रस्ता, देशातील सर्वात पहिला असा हा सागरी मार्ग आहे. त्यानंतर सर्वात मोठे भुयार, पुणे मिसिंगलिंग प्रकल्पाच्या निमित्ताने आपण तयार करत आहोत. यामुळे मुंबई पुणे प्रवास अर्धा तासाने वाचणार असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. अडीच वर्ष रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार आहे. मुंबईत मेट्रोचे जाळे उभा करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

विविध मार्ग प्रगतीपथावर : ठाणे बायपास रस्त्याचे काम अतिशय प्रगतीपथावर आहे. आनंदनगर साकेत मार्गे अहमदाबाद मुख्य हायवेला हा रस्ता जोडला जाणार आहे. भिवंडी हायवेसुद्धा आठ पदरी करण्याचे काम सुरू आहे. रेवस रेड्डी मार्ग, पुणे रिंग रोड मार्ग तसेच मुंबई गोवा कोस्टल हायवे, तसेच नागपूर गोवा ग्रीनफिल्ड हायवे हे मार्ग प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.

केंद्राकडून पायाभूत सुविधांसाठी मदत : राज्यातील विविध पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळत आहे. त्यामुळे केंद्राच्या मदतीने आता राज्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी सभागृहात व्यक्त केला.

सोन्यासारख्या माणसांसाठी चहापान : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी होत असलेल्या चहापानावर दोन कोटी पेक्षा अधिक रुपयांचा खर्च झाल्याचा उल्लेख अजित पवार यांनी सभागृहात केला होता. याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्याकडे सोन्यासारखी जनता येते. त्यांच्यासाठी चहापान देणे अयोग्य आहे का? गेल्या अडीच वर्षात वर्षा बंगल्यावर एकही माणूस गेला नाही. तेव्हा चहापानाचा खर्च तरीही का दिसत होता असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला.

सिंचनाच्या प्रकल्पांसाठी तरतूद : राज्यात सिंचनाच्या अनेक प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी 38 हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. या माध्यमातून पाच लाख 21 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल असा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. जगाला हेवा वाटेल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील जनतेला दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार असल्याची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

कोकण विकास क्षेत्र प्राधिकरण स्थापनार : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण विकास प्रदेश प्राधिकरण लवकरच स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. या प्राधिकरणाच्या माध्यमातून कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. रस्ते वीज, रोजगार यासाठी मुख्यत्वे हे प्राधिकरण काम करेल, असे त्यांनी सांगितले. यादरम्यान आमदारांनी स्थगिती दिलेल्या कामावरची स्थगिती उठवावी अशी मागणी केली असता सर्व कामांवरची स्थगिती लवकरच उठवू, सर्वांना निधी देऊ, असे ते म्हणाले.

हेही वाचा - Underworld Don Arun Gawli : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटकेसाठी उच्च न्यायालयात धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.