ETV Bharat / state

कोरोनाचा म्हाडाला 'असा'ही फायदा; बीडीडी चाळीतील रहिवाशांचा स्थलातरांला होकार - n m joshi aprartment mumbai

कोरोनाच्या भीतीने ना. म. जोशी आणि नायगावमधील रहिवाशांचा आता म्हाडाला असणारा विरोध मावळला आहे. अनेकांनी आता आम्हाला संक्रमण शिबिरात स्थलांतरित करा, अशी मागणी करण्यास सुरुवात केली आहे. म्हाडाच्या मुंबई ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय घेतल्यापासून अनेक रहिवाशांनी याला विरोध केला. मात्र, आता हा अडथळा कोरोनामुळे दूर होण्यास सुरुवात झाली आहे.

BDD chawl
बीडीडी चाळ
author img

By

Published : Jul 6, 2020, 12:45 PM IST

मुंबई - 100 वर्षांहुन अधिक जुन्या बीडीडी चाळीचा कित्येक वर्षे रखडलेला पुनर्विकास म्हाडा मार्गी लावणार आहे. यासाठी म्हाडाला काही रहिवाशांकडून जोरदार विरोध होत होता. अनेकांनी संक्रमण शिबिरातच जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे म्हाडाची डोकेदुखी वाढली. पण आता मात्र ही अडचण दूर होताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे म्हाडाची इतकी मोठी अडचण कोरोनाने दूर केली आहे.

कोरोनाच्या भीतीने ना. म. जोशी आणि नायगावमधील रहिवाशांचा आता म्हाडाला असणारा विरोध मावळला आहे. अनेकांनी आता आम्हाला संक्रमण शिबिरात स्थलांतरित करा, अशी मागणी करण्यास सुरुवात केली आहे. म्हाडाच्या मुंबई ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय घेतल्यापासून अनेक रहिवाशांनी याला विरोध केला. रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्याच नाही तर पुनर्विकास पुढेच जाणार नाही. त्यामुळे पहिल्याच पायरीला पुनर्विकासात अडथळा निर्माण झाला होता. मात्र, आता हा अडथळा कोरोनामुळे दूर होण्यास सुरुवात झाली आहे.

कोरोनाच्या काळात ना. म. जोशी आणि वरळी बीडीडीत मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळले. यामुळे अक्षरशः बीडीडी चाळ सील करावी लागली. 160 फुटाच्या घरात 5 ते 8 तर 10-12 ही लोकांचेही कुटुंब राहते. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे अशक्य झाले. तर एका मजल्यावर 20 कुटुंबासाठी फक्त 6 सार्वजनिक शौचालय आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती वाढली आहे. आता याच भीतीने अनेक रहिवाशी टॉवरमध्ये संक्रमण शिबिरात राहायला जाण्यास तयार होऊ लागले आहेत. तसे फोन आता येऊ लागल्याची माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'ईटीव्ही भारत' ला दिली.

हेही वाचा - 'महाविकास आघाडीत बिघाडी नाही, पण काही लोक आघाडीत बिघाडी होण्याची वाट पाहात आहेत'

प्रमोद बागावे हे ना. म. जोशी येथील इमारत क्रमांक 13-62 मध्ये राहतात. त्यांचाही पुनर्विकासाला विरोध होता. आता मात्र 70 वर्षाच्या आईला कोरोनाच्या काळात छोट्या घरात ठेवणे आणि तिला सार्वजनिक संडासात पाठवणे धोक्याचे वाटू लागले आहे. तर आता पावसाळ्यात घरही गळू लागले आहे. त्यामुळे सर्व विचार करत आपण पुनर्विकासाला साथ देण्याचा निर्णय घेत आपल्याला लवकरात लवकर संक्रमण शिबीरात स्थलांतरित करा, अशी मागणी केल्याचे बागवे यांनी सांगितले.

तर इमारत क्रमांक 13 मधील रहिवासी सुरेश पाटील ही आता टॉवरमध्ये जाण्यास तयार झाले आहेत. संक्रमण शिबिरातील घर टॉवरमध्ये आहे. संडास-बाथरुमची सोय घरातच असल्याने आम्ही स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतल्याचे ते सांगतात. आता हे रहिवाशी स्थलांतरासाठी तयार आहेत. त्यातील अनेकांची पात्रता निश्चिती झाली आहे. कोरोना काळात त्यांना स्थलांतरित करणे शक्य नाही. मात्र, कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर आधी हे काम हाती घेऊ, असेही मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.