मुंबई - दुसरी लाट लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना बाधित करत आहे. त्यातही तरुणाना नव्या विषाणू स्वरुपाची लागण मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशावेळी कोरोना रुग्णांवर उपचार करणारे आणि संक्रमित परिसरात राहणाऱ्या तरुण निवासी डॉक्टरांनाही नवा म्युटंट आपल्या कचाट्यात ओढत असल्याचे चित्र आहे. कारण केवळ दोन महिन्यांत, मार्च-एप्रिलमध्ये राज्यभरातील 463 निवासी डॉक्टर कोरोनाबाधित झाले आहेत. ही चिंतेची बाब असली तरी दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे निवासी डॉक्टर बरे होत असून सुदैवाने आतापर्यंत कुणाच्या जीवाला धोका पोहोचलेला नाही.
मार्च 2020 पासून देताहेत सेवा
राज्यात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्याबरोबर मुंबई आणि सर्व जिल्ह्यातील रुग्णालयात कोविड कक्ष सुरू करत मोठ्या संख्येने निवासी डॉक्टरांना कोविड सेवेत रुजू करून घेतले. पुढे रुग्णसंख्या वाढल्यानंतर सर्वच निवासी डॉक्टरांना कोविड सेवेत दाखल करुन घेण्यात आले. आज राज्यात अंदाजे 5000 निवासी डॉक्टर असून सर्व कोविड रुग्णांना सेवा देत आहेत. एक वर्षांहून अधिक काळ केला तरी न थकता जीवाची बाजी लावून रुग्ण सेवा देत आहेत, कॊरोना लढत आहेत. महत्वाचे म्हणजे अगदी पॉझिटिव्ह आलेले निवासी डॉक्टर बरे झाल्यावर तात्काळ पुन्हा कामावर रुजू होत आहेत. तर आता दुसरी लाट आली असून आता निवासी डॉक्टर यात महत्वाची भूमिका बजावत असून आज ही ते अविरत सेवा देत आहेत.
पहिल्या लाटेत अंदाजे 1000 निवासी डॉक्टरांना झाली होती बाधा
मार्चपासून निवासी डॉक्टर कॊरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. कॊरोना रुग्णांच्या संपर्कात सातत्याने येत असल्याने त्यांना संसर्गाची भीती अधिक असते. त्यानुसार पहिल्या लाटेत निवासी डॉक्टर ही मोठ्या प्रमाणावर बाधित झाले होते. अंदाजे 1000 डॉक्टरांना फेब्रुवारी 2021 पर्यंत कॊरोनाची लागण झाली होती. तर हे सर्व डॉक्टर कॊरोनाला हरवून बरे होऊन पुन्हा रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती डॉ ज्ञानेश्वर ढोबळे, अध्यक्ष, मार्ड यांनी दिली आहे. दरम्यान दुसरी लाट मात्र निवासी डॉक्टरांची चिंता वाढवणारी आहे. कारण दुसऱ्या लाटेत केवळ दोन महिन्यांत 463 निवासी डॉक्टर बाधित झाले आहेत.
पुणे आणि जे जे रुग्णालय आघाडीवर
पहिल्या लाटेतील कॊरोना विषाणू ज्या वेगाने पसरत होत्या त्याच्या चौपट वेगाने दुसऱ्या लाटेतील नवीन म्युटंट पसरत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणावर ताण येत असताना निवासी डॉक्टरच बाधित होत असल्याने मनुष्यबळ ही कमी होत आहे. डॉ दोबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च-एप्रिलदरम्यान 463 निवासी डॉक्टर कॊरोना बाधित झाले आहेत. ही बाब चिंताजनक आहे. दरम्यान पुणे आणि जे जे रुग्णालयातील बाधित डॉक्टरांचा आकडा मोठा आहे. जे जे रुग्णालयातील 74 डॉक्टरांना कॊरोनाची लागण झाली आहे. तर पुण्यातील बीजेएमसी रुग्णालयातील 75 डॉक्टर कॊरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या पाठोपाठ औरंगाबादमधील जीएमसी रुग्णालयातील बाधित डॉक्टरांचा आकडा 65 असा आहे. एकुणच निवासी डॉक्टर बाधित होत आहेत. पण त्यांना त्वरित उपचार दिले के असून सकारात्मकता आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर हे डॉक्टर बरे होत आहेत. दुसरी लाट इतकी भयानक असतानाही आतापर्यंत एका डॉक्टरच्या जीवाला धोका पोहचलेला नाही. त्यांचा मृत्यूदर 0% आहे. ही बाब अत्यंत दिलासादायक आहे. मात्र त्याचवेळी कित्येक महिन्यापासू सेवा देणाऱ्या या कॊरोना योध्याना आवश्यक त्या सुविधा पुरवण्याची ही गरज आहे. तर निवासी डॉक्टरांच्या अनेक मागण्या असून त्या मागण्यांची पूर्तता होण्याची गरज आहे.
बाधित निवासी डॉक्टरांची आकडेवारी
- जे जे रुग्णालय, मुंबई-743
- जीएमसी, नागपूर-38
- व्हिएमजीएमसी, सोलापूर-24
- जीएमसी, अंबेजोगाई-09
- नायर, मुंबई-24
- आरजेएमसी, ठाणे-04
- जीएमसी, मिरज-05
- जीएमसी, औरंगाबाद-65
- बीजेएमसी, पुणे-75
- पीएमसी, पिंपरी-06
- व्हीडीजीआयएमएस, लातूर-06
- जीएमसी, नांदेड-20
- जीएमसी, यवतमाळ-22
- जीएमसी, अकोला-13
- जेजीजीएमसी, नागपूर-24
- आरसीएसएमजीएमसी, कोल्हापूर-03
- केईएम, मुंबई-28
- एसबीएचजीएमसी, धुळे-02
- सायन रुग्णालय, मुंबई-21
- एकूण 463