मुंबई - मुंबईतील डोंगरी परिसरातील केसरबाई मेंशन ही ४ मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी आहेत. दरम्यान, पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या मदतीने घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
इमारत कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री विखे पाटील यांनी दिली आहे.
याठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. तर स्थानिक नागरिकही बचावकार्यात मदत करत आहेत. तसेच परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.