मुंबई - गोरेगावमध्ये नाल्यात पडलेल्या ३ वर्षीय मुलगा दिव्यांश २ दिवसानंतरही सापडला नाही. दरम्यान, अग्निशमन विभागाने सर्च ऑपरेशन थांबवले आहे.
बुधवारी रात्री नाल्यात पडलेल्या दिव्यांशचे शुक्रवारी सकाळपासून पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. रात्री पडलेल्या पावसामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला होता. त्यामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण होत होता. दरम्यान, आज २ दिवसानंतरही दिव्यांश सापडला नसल्याने अग्निशमन दलाने सर्च ऑपरेशन थांबवले आहे.