मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात विविध कारखाने, हॉटेल्स आस्थापना येथे छुप्या पध्दतीने बालकांना कामावर ठेवले जाते आणि या आस्थापनेची गोपनीय माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कारवाई करून बाल कामगारांची सुटका करण्याबाबत वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले होते. मुंबई या शाखेस मुंबई शहरातील समतानगर परिसरात काही आस्थापनांमध्ये लहान मुले बालकामगार म्हणून काम करीत असल्याची विश्वसनीय माहिती गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यानंतर मिळालेल्या माहितीची शहानिशा केल्यावर कारवाई करण्याचे ठरवण्यात आले आहे.
अल्पवयीन बालकांची बालमजूरीतून मुक्तता : 17 फेब्रुवारीला विशेष बाल पोलीस कक्ष (S.J.P.U.) पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार कदम आणि पोलीस पथकाने प्रथम या स्वंयसेवी संस्थेचे मदतीने साडेपाच वाजताच्या सुमारास देसाई व कदम चाळ, पोटमाळा, बाणडोंगरी, अशोक नगर, हनुमान मंदिर जवळ, कांदिवली पूर्व येथील शुभंकर मंडल यांचा इमिटेशन ज्वेलरीचा कारखाना, देसाई व कदम चाळ, पोटमाळा, बाणडोंगरी अशोकनगर, हनुमान मंदिर जवळ, कांदिवली पूर्व येथे छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत आस्थापनेमधून इमिटेशन ज्वेलरी कानातील रिंगला डायमंड लावण्याचे काम करीत असलेल्या एकूण पाच अल्पवयीन बालकांची बालमजूरीतून मुक्तता करण्यात आली आहे.
ज्वेलरीच्या मालकाविरोधात कारवाई : या कारवाईत इमिटेशन ज्वेलरीच्या मालकास ताब्यात घेण्यात आले आहे. मालकाचे नाव शुभंकर मोरारी मंडल, (वय ३६ वर्षे)असून तो मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज परिसरातील उषा सदन चाळीत राहतो. समतानगर पोलीस ठाण्यात इमिटेशन ज्वेलरीच्या मालकाविरोधात कलम ७५, ७९ बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मालवणकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली : ही कारवाई पोलीस सह आयुक्त, (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) ज्ञानेश्वर चव्हाण आणि पोलीस उप-आयुक्त (अंमलबजावणी) डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बाल पोलीस कक्ष (S.J.P.U.) वे सपोआ चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक मनोज सुतार, पोलीस उप निरीक्षक नंदकुमार कदम, पोलीस हवालदार मालवणकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
हेही वाचा : संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयावरही शिंदे गटाचा ताबा.. लोकसभा सचिवांनी काढलं पत्र