ETV Bharat / state

विधान परिषद निवडणूक : एकही जागा न दिल्याने रिपाइं भाजपवर नाराज

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला येणाऱ्या 4 जागांपैकी एक जागा रिपाइंला द्यावी, अशी आमची मागणी होती. मात्र, भाजपने एकही जागा न दिल्याने राज्यभरातील कार्यकर्ते नाराज असल्याची प्रतिक्रिया आठवले यांनी व्यक्त केली आहे.

Republican Party
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
author img

By

Published : May 8, 2020, 5:22 PM IST

मुंबई - विधान परिषदेच्या उमेदवारीत पक्षाच्या दिग्गज नेत्यांना डावलल्याने भाजपवर नाराजी व्यक्त होत आहे. अशातच भाजपचा घटक पक्ष असलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाराज असल्याचे समोर आले आहे. रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षाला विधान परिषदेच्या एका जागेची मागणी केली होती. मात्र, भाजपच्या केंद्रीय निवड समितीने आठवले यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत त्यांची पाटी कोरीच ठेवली. त्यामुळे रामदास आठवले नाराज आहेत.

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला येणाऱ्या 4 जागांपैकी एक जागा रिपाइंला द्यावी, अशी आमची मागणी होती. मात्र, भाजपने एकही जागा न दिल्याने राज्यभरातील कार्यकर्ते नाराज असल्याची प्रतिक्रिया आठवले यांनी व्यक्त केली आहे.

मागील 8 वर्षांपासून पक्ष ताकदीने भाजपसोबत असून, मित्रपक्ष म्हणून कायम भाजपला रिपाइंने खंबीर साथ दिली आहे. मागील 8 वर्षांत भाजपने पक्षाला राज्यात एकही विधान परिषदेचे जागा दिलेले नाही. त्यामुळे येत्या 21 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत रिपाइंला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपने जागा न दिल्याने पक्षाचे कार्यकर्ते नाराज असल्याचे आठवले यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.