मुंबई - मुंबईतील नायर रूग्णालयामध्ये एका पेशंटच्या नातेवाईकांनी 3 डॉक्टरांवर हल्ला करत त्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्याबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णलयातील सामानांचीही तोडफोड केली. रूग्णालयामध्ये उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाचा रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. त्यानंतर पहाटे त्या रुग्णाचे नातेवाईक रुग्णालयामध्ये आले आणि त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली.
-
Mumbai: Relatives of a 49-year-old patient, admitted at Nair Hospital, allegedly abused & attacked 3 resident doctors, security guards & vandalised hospital property, after he died y'day. FIR has been registered & case has been taken up by Agripada Police Station. #Maharashtra pic.twitter.com/dpw7UE4bCf
— ANI (@ANI) July 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai: Relatives of a 49-year-old patient, admitted at Nair Hospital, allegedly abused & attacked 3 resident doctors, security guards & vandalised hospital property, after he died y'day. FIR has been registered & case has been taken up by Agripada Police Station. #Maharashtra pic.twitter.com/dpw7UE4bCf
— ANI (@ANI) July 14, 2019Mumbai: Relatives of a 49-year-old patient, admitted at Nair Hospital, allegedly abused & attacked 3 resident doctors, security guards & vandalised hospital property, after he died y'day. FIR has been registered & case has been taken up by Agripada Police Station. #Maharashtra pic.twitter.com/dpw7UE4bCf
— ANI (@ANI) July 14, 2019
संतप्त झालेल्या नातेवाईकांनी कोणतेही कारण ऐकून न घेता डॉक्टरांवरांना मारहाण केली. या घटनेमुळे डॉक्टरांमध्ये पुन्हा एकदा असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने निवासी डॉक्टरांना संरक्षण द्यावे, अशी डॉक्टरांनी मागणी केली आहे. हे नातेवाईक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी डॉक्टरांच्या मदतीला आलेल्या सुरक्षा रक्षकालाही मारहाण केली. या प्रकरणी अग्निपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.