ETV Bharat / state

पालिका रुग्णालयातील आयसीयूमधील कोरोना रुग्णांची माहिती नातेवाईकांना दररोज मिळणार - mumbai corona update today

आयसीयूमधील कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृतीची माहिती रोज त्यांच्या नातेवाईकांना वॉर्डमधील मुख्य नर्सकडून दिली जावी, अशी मागणी डॉ. सईदा खान यांनी केली होती. आरोग्य विभागाचे उपायुक्त रमेश पोवार यांनी मागणी मान्य केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज माहिती मिळणार आहे.

relative's get info of corona patient
कोरोना रुग्णांची माहिती नातेवाईकांना मिळणार
author img

By

Published : May 25, 2020, 11:47 AM IST

मुंबई - शहरात कोरोनाचा कहर वाढत असून हजारो रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. मात्र, आयसीयूमधील रुग्णांची माहिती नातेवाईकांना मिळत नव्हती. ही माहिती त्यांच्या नातेवाईकांना रोज दिली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका व आरोग्य समितीच्या सदस्या डॉ. सईदा खान यांनी आरोग्य विभागाचे उपायुक्त रमेश पोवार यांच्याकडे केली होती. ही मागणी पालिकेने मान्य केल्याने आयसीयूमधील रुग्णांची माहिती नातेवाईकांना मिळणार आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30 हजार 542 वर पोहोचली आहे. त्यापैकी 988 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 7400 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यावर त्याला कोरोना केअर सेंटरमध्ये किंवा रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्यास त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार केले जातात. कोरोना केअर सेंटरमधील रुग्णांकडे मोबाईल असल्याने त्यांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळत असते.

रुग्णालयात आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांसोबत कोणालाही राहायची परवानगी नसते. कधी कधी तर रुग्ण हॉस्पिटलमध्ये असताना त्याचे कुटुंबीय क्वारंटाइन असतात. अशावेळी आयसीयूमधील रुग्णाची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळत नाही. रुग्ण बरा झाला किंवा त्याचा मृत्यू झाला तरच त्याची माहिती रुग्णालयातून दिली जाते. कधी कधी तर रुग्णाचा मृत्यू झाल्याची चुकीची माहिती इतरांकडून दिली जात असल्याने नातेवाईकांची पळापळ होते.

रुग्णांना सलाईन मधून अँटीबायोटिक इंजेक्शन दिल्याने त्यांना रिऍकशन होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे आयसीयूमधील रुग्णांच्या प्रकृतीची माहिती रोज त्यांच्या नातेवाईकांना वॉर्डमधील मुख्य नर्सकडून दिली जावी, अशी मागणी डॉ. सईदा खान यांनी केली होती. आरोग्य विभागाचे उपायुक्त रमेश पोवार यांनी मागणी मान्य केली आहे.

व्हेंटिलेटरवर 198 तर आयसीयूत 538 रुग्ण -

मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार 22 मे रोजी मुंबईत सध्या 5392 रुग्ण दाखल होते. त्यापैकी पालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयात 4056 तर खासगी रुग्णालयात 1336 रुग्ण दाखल होते. त्यामधील 583 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत तर 198 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोना केअर सेंटर 2 मध्ये 3658 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना केअर सेंटर 1 मध्ये अतिजोखमीचे 15607 रुग्ण भरती आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.