ETV Bharat / state

मुंबई रेल्वे सुरक्षा दलात 19 श्वानांची भरती; अमली पदार्थ तस्करीला बसणार आळा

author img

By

Published : Mar 28, 2021, 7:26 PM IST

सध्या मुंबई विभागात एकूण 36 श्वानाची संख्या स्वीकृत करण्यात आली आहे. यातील सर्वाधिक श्वानांना बॉम्ब शोधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र, यातील 7 श्वान निवृत्त झाले आहेत. कोरोनामुळे यांच्या जागी नवीन श्वानांची आतापर्यंत नियुक्ती झालेली नाही. मात्र, आता निवृत्त होणाऱ्या श्वानांच्या जागी इतर नवीन 9 श्वान मुंबई विभागासाठी तसेच संपूर्ण मध्य रेल्वेत 19 श्वान घेतले जाणार आहे.

मुंबई रेल्वे श्वान
मुंबई रेल्वे श्वान

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून रेल्वेतून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या तस्करीची प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, या तस्करांना आळा घालण्यासाठी रेल्वेकडे सक्षम यंत्रणा नाही. त्यामुळे आता मध्य रेल्वेकडून तस्करांना रोखण्यासाठी आणि अमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलात 19 नव्या श्वानांची भरती करण्यात येणार आहे.

रेल्वेचे 7 श्वान निवृत्त
रेल्वे मार्गाने अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तस्करांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पाच ते सात श्वान पथक तैनात केले जाणार आहेत. सध्या मुंबई विभागात एकूण 36 श्वानांची संख्या स्वीकृत करण्यात आली आहे. यातील सर्वाधिक श्वानांना बॉम्ब शोधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र, यातील 7 श्वान निवृत्त झाले आहे. कोरोनामुळे यांच्या जागी नवीन श्वानांची आतापर्यंत नियुक्ती झालेली नाही. मात्र, आता निवृत्त होणाऱ्या श्वानांच्या जागी इतर नवीन 9 श्वान मुंबई विभागासाठी तसेच संपूर्ण मध्य रेल्वेत 19 श्वान घेतले जाणार आहे. तसा प्रस्तावही मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने तयार केला आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिली आहे.

माहिती देतांना प्रतिनिधी
15 एप्रिलपर्यंत सेवेत होणार दाखल
आरपीएफच्या पथकात नऊ डॉबरमन, लेब्रोडोर रिट्रीवर (स्निपर), जर्मन शेफर्ड श्वान भरती होणार आहे. तर, यापैकी दोन श्वान गांजा, चरस, एमडी तस्कऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असणार आहेत. 15 एप्रिलपर्यंत मध्य रेल्वेच्या आरपीएफच्या पथकात हे श्वान भरती होणार आहेत. त्यानंतर यासाठी आठ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे बॉम्ब पथकात असणार्‍या श्वानांना प्रशासनाकडून मिळालेल्या ज्वलनशील पदार्थांचा नेहमी वास दिला जातो. जेणेकरून ते स्फोटकांचा वास विसरणार नाहीत. अमली पदार्थ विरोधी पथकात समावेश असणाऱ्या श्वानांना अमली पदार्थांचा वास दिला जातो. यामध्ये वारंवार तस्करी केल्या जाणार्‍या चरस,गांजा,कोकेन,इफिड्रीन यांचा समावेश आहे.
चार श्वान पथक
मध्य रेल्वे मुंबई विभागात एकूण चार श्वान पथक आहेत. माटुंगा, कल्याण, कर्नाक बंदर, एलटीटी येथे श्वान पथक विभाग आहे. या श्वान पथकात डॉबरमन, लेब्रोडोर रिट्रीवर (स्निपर) या जातीचे श्वान आहेत. विस्फोटक,अमली पदार्थांचा गंध घेऊन शोध घेण्यासाठी लेब्रोडोर रिट्रीवर (स्निपर) श्वानाचा वापर केला जातो. तर, प्रवाशांची सुरक्षा, स्थानकावर गस्त घालण्यासाठी डॉबरमन श्वानाचा वापर केला जातो.

हेही वाचा-एनआयएकडून सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीवर केली तपासणी; सीपीयू आणि डीव्हीआर केला जप्त

हेही वाचा-मुंबईत आजपासून सुरू होणार नाइट कर्फ्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.