मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न ( Maharashtra Karnataka border issue ) सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार व अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उच्चाधिकार समितीत यांचा समावेश - राज्यात ३० जून रोजी शिंदे -फडणवीस सरकार आल्यावर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभा सदस्य शरद पवार, आमदार पृथ्वीराज चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्येमंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तानाजी सांवत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, माजी आमदार राजेश क्षीरसागर, विरोधी पक्षनेते अजित पवार व अंबादास दानवे यांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.