ETV Bharat / state

'त्या' कुटूंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपये व पालिकेची नोकरी द्या - रवी राजा - महापालिका

जोगेश्वरी येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये डोळ्यांची शस्त्रक्रिया करताना अंधत्व आलेल्या रुग्णांना २० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी. तसेच त्यांच्या कुटुंबातील एकाला पालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणी सभागृह विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली.

रवी राजा
author img

By

Published : Feb 12, 2019, 1:55 PM IST

मुंबई - महापालिकेच्या जोगेश्वरी येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये डोळ्यांची शस्त्रक्रिया करताना अंधत्व आलेल्या रुग्णांना २० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी. तसेच त्यांच्या कुटुंबातील एकाला पालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणी सभागृह विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली. रवी राजा यांनी पालिका सभागृहात या प्रकरणी निवेदन सादर केले होते. त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा देत आरोग्य विभागाचे वाभाडे काढले. याबाबत पुढील बैठकीत आयुक्तांनी कारवाईचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

रवी राजा
undefined

बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटरमध्ये ४ जानेवारीला डोळ्यावर शस्त्रक्रिया करताना जंतुसंसर्गामुळे ७ जणांना अंधत्व आले होते. त्यापैकी ३ जणांना कायमची दृष्टी गमवावी लागली. या धक्कादायक प्रकारानंतर २५ जानेवारीला नगरसेवक अभिजित सामंत यांनी स्थायी समितीत याची माहिती देताच आयुक्तांनी ७ दिवसात अहवाल देण्याचे कबूल केले होते. मात्र, आजतागायत अहवाल आला नाही. त्यामुळे विरोधी पक्षेनेते रवी राजा यांनी सोमवारी सभागृहात निवेदन दिले. या निवेदनात या प्रकरणी चौकशी समितीचा अहवालही अद्याप आलेला नाही. या घडलेल्या प्रकाराला महानगरपालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणाचे कारणीभूत आहे. यामुळे महापालिकेने पीडितांना प्रत्येकी २० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली.

नगरसेवक अभिजित सामंत यांनी विविध दाखले देत आरोग्य खात्याची पारदर्शकता लोप पावत चालल्याचे सांगत आरोग्य खात्याला भ्रष्टाचाराचा संसर्ग झाल्याचा आरोप केला. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी तर या प्रकरणी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि परिचारिका यांना सोडून सुपरिटेंडंटवरच कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. तसेच त्यांनी चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार होत असल्याचाही आरोप केला. दरम्यान, चौकशी समितीने सर्वांगाने चौकशी करून येत्या सभागृहात कारवाईचा अहवाल सादर करावा व दोषींवर कारवाई करावी, अशा सूचना महापौर महाडेश्वर यांनी दिल्या आहेत.

Intro:मुंबई -
मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये डोळ्यांची शस्त्रक्रिया करताना अंधत्व आलेल्या रुग्णांना २० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी तसेच त्यांच्या कुटुंबातील एकाला पालिकेत नोकरी द्यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते रावी राजा यांनी सभागृहात केली. रवी राजा यांनी पालिका सभागृहात या प्रकरणी निवेदन सादर केले होते. त्याला सर्व पक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा देत आरोग्य विभागाचे वाभाडे काढले. याबाबत पुढील बैठकीत आयुक्तांनी कारवाईचा अहवाल सादर करावा अशा सूचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला दिल्या.
Body:हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटरमध्ये 4 जानेवारी रोजी शस्त्रक्रिया करताना जंतुसंसर्गामुळे सातजणांना अंधत्व आले होते. त्यापैकी तीन जणांना कायमची दृष्टी गमवावी लागली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर 25 जानेवारी रोजी नगरसेवक अभिजीत सामंत यांनी स्थायी समितीत याची माहिती देताच आयुक्तांनी सात दिवसात अहवाल देण्याचे कबूल केले होते. मात्र आजतागायत अहवाल न आल्याने विरोधी पक्षेनेते रवी राजा यांनी सोमवारी सभागृहात निवेदन करताना मुंबई महापालिका रुग्णालयातील अनागोंदी कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली. याप्रकरणी चौकशी समितीचा अहवालही अद्याप आलेला नाही. झाल्या प्रकारास महानगरपालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणाच कारणीभूत असल्याचे सांगतानाच त्यांनी पीडितांना प्रत्येकी 20 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या मुंबईच्या आरोग्य खात्यालाच भ्रष्टाचारा संसर्ग झाला असून, ते असंवेदनशील बनले आहे. येथे उंदीर रुग्णांना ओरबडतात, तर पुरवठा करणारे कंत्राटदाररूपी उंदीर मस्तवाल झाले आहेत. रुग्णसेवेसाठी असलेले अनुदानही खर्च न होता परत जाते. त्यामुळे आरोग्य खात्याविषयी श्वेतपत्रिका काढावी, अशा शब्दात सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोगेश्वरीतील ट्रामा केअर सेंटरमधील अंधत्व प्रकरणी आरोग्य खात्याचे वाभाडे काढले. नगरसेवक अभिजीत सामंत यांनी विविध दाखले देत आरोग्य खात्याची पारदर्शकता लोप पावत चालल्याचे सांगत आरोग्य खात्याला भ्रष्टाचाराचा संसर्ग झाल्याचा आरोप केला. तर राखी जाधव यांनी आरोग्य खात्याचाही खासगीकरणाकडे कल असल्याचे सांगत पीडितांना नुकसानभरपाईबरोबरच त्यांच्या कुटुंबातील एकाला पालिका सेवेत सामावून घेण्याची मागणी केली.

स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी तर याप्रकरणी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि परिचारिका यांना सोडून सुपरिटेंडंटवरच कारवाई करण्यात आल्याचे सांगत चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असल्याचे म्हणाले. या प्रकारामुळे रुग्णसेवेलाच गालबोट लागले असून विश्वासार्हताच लोप पावल्याचे शल्य मनोज कोटक यांनी व्यक्त करून येथे विविध वस्तूंचा पुरवठा करणारे कंत्राटदाररूपी उंदीर माजल्याचे ते म्हणाले. या एकूणच अनागोंदी कारभारामुळे आरोग्य खात्याविषयी श्वेतपत्रिका काढण्याची त्यांनी मागणी केली. या विषयावर इतर नगरसेवकांनी ताशेरे ओढत प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, चौकशी समितीने सर्वांगाने चौकशी करून येत्या सभागृहात कारवाईचा अहवाल सादर करावा व दोषींवर कारवाई करावी अशा सूचना महापौर महाडेश्वर यांनी दिल्या. Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.