ETV Bharat / state

खड्ड्यांसाठी ५०० रुपये, पालिका प्रशासनाकडून मुंबईकरांची दिशाभूल

प्रशासनाने १ ते ७ नोव्हेंबर या सात दिवसांसाठी 'खड्डे दाखवा ५०० रुपये मिळावा' ही योजना जाहीर केली. या योजनेनुसार जे खड्डे २४ तासात बुजवले जाणार नाहीत त्या तक्रारदारांना ५०० रुपये दिले जातील, असे पालिका प्रशासनाने जाहीर केले. याचे पडसाद मागील स्थायी समितीत उमटले होते.

रवी राजा
author img

By

Published : Nov 6, 2019, 11:27 PM IST

मुंबई - पावसाळा गेला तरी मुंबईतील रस्त्यांवर खड्डे आहे तसेच आहेत. यासाठी महापालिका आयुक्तांनी 'खड्डे दाखवा ५०० रुपये मिळवा' अशी योजना जाहीर केली. या योजनेनुसार मुंबईकरांनी पालिकेकडे तक्रारी केल्या. ज्या तक्रारींची दखल २४ तासात घेतली नाही, अशा तक्रारदारांना ५०० रुपये दिले जातील, असे पालिकेने जाहीर केले. मात्र, पालिकेकडून कोणी कोणाला आणि कशा प्रकारे पैसे द्यायचे याचे नियोजन केलेले नाही. यामुळे पालिकेने जाहीर केलेले ५०० रुपये एकाही तक्रारदाराला अद्याप देण्यात आलेले नाहीत. त्यांमुळे पालिकेकडून मुंबईकरांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला.

रवी राजा

हेही वाचा- पुण्यात शिवसैनिकांचा राडा; पीक विम्याच्या पैशांसाठी फोडले विमा कंपनीचे कार्यालय

पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने कंत्राटदारांची नेमणूक करुन तब्बल ८० कोटी रुपयांचे कंत्राट दिले. मात्र, तरीही मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांनी रस्त्यांची चाळण झाली आहे. नोव्हेंबर उजाडला तरी मुंबईतील खड्डे बुजत नसल्याने मुंबईकरांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे प्रशासनाने १ ते ७ नोव्हेंबर या सात दिवसांसाठी 'खड्डे दाखवा ५०० रुपये मिळावा' ही योजना जाहीर केली. या योजनेनुसार जे खड्डे २४ तासात बुजवले जाणार नाहीत त्या तक्रारदारांना ५०० रुपये दिले जातील असे पालिका प्रशासनाने जाहीर केले. याचे पडसाद मागील स्थायी समितीत उमटले होते. त्यावर आज पालिका प्रशासनाकडून उत्तर देण्यात आले. मात्र, या उत्तरात किती मुंबईकरांना ५०० रुपये कसे आणि कोणी दिले याची माहिती देण्यात आली नसल्याने सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आज पुन्हा स्थायी समितीत खड्ड्यांचा विषय मांडला. पालिकेने जाहीर केल्यानुसार पालिकेकडे तीन ते चार दिवसात अ‌ॅपवर ८७९ तक्रारी आल्या. त्यामधील ८५ तक्रारींवर कारवाई केली नाही. या ८५ खड्ड्यांचे ५०० रुपये प्रमाणे ४२ हजार ५०० रुपये कोण देणार असा प्रश्न उपस्थित केला. २४ वॉर्डमध्ये ४४५ तक्रारी आल्या. सोमवारी ११८ तक्रारी आल्या या तक्रारींचे पुढे काय झाले याची माहिती पालिका प्रश्नासनाकडून देण्यात आलेली नाही. नगरसेवक तक्रारी करतात त्यांच्या तक्रारींकडे लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित केला. पालिकेने जाहीर केलेले ५०० रुपये किती लोकांना देण्यात आले याची माहिती द्यावी अशी मागणी भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी केली. पालिका आता २४ तासात खड्डे बुजवत आहे. त्याचप्रकारे नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई केली जाणार का, प्रशासनाने जे खड्डे बुजवले आहेत ते खड्डे पुन्हा दिसणार नाहीत का? असे प्रश्न भाजपाच्या ज्योती आळवणी यांनी केले.

यावर पालिकेकडून १ हजार ९१६ माय बीएमसी ट्विटर, पालिकेची वेबसाईट आणि १९ सप्टेंबर रोजी लॉंच केलेल्या अ‌ॅपवरुन खड्ड्यांच्या तक्रारी येतात. या तक्रारींची दखल विभाग स्तरावर घेतली जाते. पालिकेकडे पावसाळ्यात १ हजार ५५१ तक्रारी आल्या होत्या. त्यावर कारवाई करण्यात आली. खड्डे दाखवा खड्डे बुजवा योजना सूरु झाल्यावर १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर या कालावधीत १ हजार ६७० तक्रारी आल्या. त्यापैकी ९१ तक्रारींची दखल घेण्यात आली. खड्डे बुजवण्यासाठी आणि ज्यांनी खड्डे बुजवले नाहीत त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, असे रस्ते विभागाचे मुख्य अभियंता संजय दराडे यांनी सांगितले.

Intro:मुंबई - पावसाळा गेला तरी मुंबईतील रस्त्यांवर खड्डे आहे तसेच आहेत. यासाठी महापालिका आयुक्तांनी 'खड्डे दाखवा ५०० रुपये मिळवा' अशी योजना जाहीर केली. या योजनेनुसार मुंबईकरांनी पालिकेकडे तक्रारी केल्या. ज्या तक्रारींची दखल २४ तासात घेतली नाही अशा तक्रारदारांना ५०० रुपये दिले जातील असे पालिकेने जाहीर केले. मात्र पालिकेकडून कोणी कोणाला आणि कशा प्रकारे पैसे द्यायचे याचे नियोजन केलेले नाही. यामुळे पालिकेने जाहीर केलेले ५०० रुपये एकाही तक्रारदाराला अद्याप देण्यात आलेले नसल्याने पालिकेकडून मुंबईकरांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला.Body:पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने कंत्राटदारांची नेमणूक करून तब्बल ८० कोटी रुपयांचे कंत्राट दिले. मात्र तरीही मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांनी रस्त्यांची चाळण झाली आहे. नोव्हेंबर उजाडला तरी मुंबईतील खड्डे बुजत नसल्याने मुंबईकरांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे प्रशासनाने १ ते ७ नोव्हेंबर या सात दिवसांसाठी 'खड्डे दाखवा ५०० रुपये मिळावा' ही योजना जाहीर केली. या योजनेनुसार जे खड्डे २४ तासात बुजवले जाणार नाहीत त्या तक्रारदारांना ५०० रुपये दिले जातील असे पालिका प्रशासनाने जाहीर केले. याचे पडसाद मागील स्थायी समितीत उमटले होते. त्यावर आज पालिका प्रशासनाकडून उत्तर देण्यात आले. मात्र या उत्तरात किती मुंबईकरांना ५०० रुपये कसे आणि कोणी दिले याची माहिती देण्यात आली नसल्याने सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आज पुन्हा स्थायी समितीत खड्ड्यांचा विषय मांडला. पालिकेने जाहीर केल्या नुसार पालिकेकडे तीन ते चार दिवसात ऍपवर ८७९ तक्रारी आल्या. त्यामधील ८५ तक्रारिंवर कारवाई केली नाही. या ८५ खड्ड्यांचे ५०० रुपये प्रमाणे ४२ हजार ५०० रुपये कोण देणार असा प्रश्न उपस्थित केला. २४ वॉर्डमध्ये ४४५ तक्रारी आल्या. सोमवारी ११८ तक्रारी आल्या या तक्रारींचे पुढे काय झाले याची माहिती पालिका प्रश्नासनाकडून देण्यात आलेली नाही. नगरसेवक तक्रारी करतात त्यांच्या तक्रारींकडे लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला. पालिकेने जाहीर केलेले ५०० रुपये किती लोकांना देण्यात आले याची माहिती द्यावी अशी मागणी भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी केली. पालिका आता २४ तासात खड्डे बुजवात आहेत त्याचप्रकारे नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई केली जाणार का, प्रशासनाने जे खड्डे बुजवले आहेत ते खड्डे पुन्हा दिसणार नाहीत का असे प्रश्न भाजपाच्या ज्योती आळवणी यांनी केले.

यावर पालिकेकडून १९१६, माय बीएमसी ट्विटर, पालिकेची वेबसाईट आणि १९ सप्टेंबर रोजी लॉंच केलेल्या ऍपवरून खड्ड्यांच्या तक्रारी येतात. या तक्रारींची दखल विभाग स्तरावर घेतली जाते. पालिकेकडे पावसाळ्यात १५५१ तक्रारी आल्या होत्या. त्यावर कारवाई करण्यात आली. खड्डे दाखवा खड्डे बुजवा योजना सूरु झाल्यावर १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर या कालावधीत १६७० तक्रारी आल्या. त्यापैकी ९१ टक्कर तक्रारींची दखल घेण्यात आली. खड्डे बुजवण्यासाठी आणि ज्यांनी खड्डे बुजवले नाहीत त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे असे रस्ते विभागाचे मुख्य अभियंता संजय दराडे यांनी सांगितले.

बातमीसाठी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांची बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.