मुंबई : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार तीन वर्षांपूर्वी सुरू झाला होता. प्रसार काहीसा कमी झाला असला तरी गेल्या 9 दिवसांत तो पुन्हा वाढला आहे. फेब्रुवारीमध्ये जेवढे रुग्ण आढळले होते तेवढेच रुग्ण गेल्या 9 दिवसांत आढळले आहेत. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा फैलाव होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
कोरोनाचा प्रसार : मुंबईमध्ये मार्च 2020 मध्ये कोरोनाचा प्रसार सुरू झाला. हा प्रसार अद्यापी सुरू आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये कोरोनाच्या चार लाटा येऊन गेल्या आणि या चारही लाटा थोपवण्यात सरकार महापालिका आणि आरोग्य विभागाला यश आले आहे. फेब्रुवारी पर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या नगण्य अशी होती. मात्र मार्चमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
असा वाढतोय कोरोना : फेब्रुवारी महिन्यामध्ये एकूण 11 लाख 55 हजार 253 रुग्णांची नोंद झाली होती. 1 मार्च रोजी 11 लाख 55 हजार 382 रुग्ण रुग्णांची नोंद झाली आहे. महिनाभरामध्ये केवळ 129 रुग्णांची नोंद झाली होती या महिन्याभरात एकही मृत्यू झालेला नाही. 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान कोरोनाच्या एकूण 108 रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 1 मार्च ते 9 मार्च या कालावधीत 499 रुग्णांची नोंद झाली आहे.
देशातही कोरोना वाढतोय : देशामध्ये तीन आठवडे तीन आठवड्यात कोरोनाच्या रुग्णसंकेत वाढ पाहायला मिळाली आहे. 27 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान 898 नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे. त्या आधीच्या आठवड्या पेक्षा 63 टक्के रुग्णांची संख्या वाढली आहे. 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान 1163 रुग्णांची नोंद झाली होती. तर 13 ते 19 फेब्रुवारी दरम्यान 839 रुग्ण आढळून आले होते.
असा पसरला कोरोना : मुंबईमध्ये मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून 9 मार्च 2023 पर्यंत म्हणजेच गेल्या 3 वर्षात कोरोनाच्या 11 लाख 55 हजार 482 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 11 लाख 35 हजार 653 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी 19 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 81 लाख 38 हजार 129 रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 79 लाख 89 हजार 286 रुग्ण बरे झाले असून 1 लाख 48 हजार 424 मृत्यू झाले आहेत.
पालिका सज्ज : मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. रुग्णसंख्या वाढली असली तरी रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची आणि रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत नाही. रुग्णालयात बेडस उपलब्ध आहेत. कोविड सेंटरही सज्ज आहे. सध्यातरी काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. रुग्णसंख्या वाढल्यास आम्ही सज्ज आहोत अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी दिली.
हेही वाचा - Sai Resort Scam : अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; साई रिसॉर्ट प्रकरणी बिझनेस पार्टनरला ईडीकडून अटक