ETV Bharat / state

"धारावीमध्ये लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणासाठी रॅपिड अक्शन फोर्स"

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. मुंबईतल्या धारावी सारख्या झोपडपट्टीत देखील दहा रुग्ण आढळले आहेत. लॉकडाउनच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी या भागात रॅपिड अक्शन फोर्स लावणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री तथा धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी दिली.

varsha gaikwad
वर्षा गायकवाड
author img

By

Published : Apr 9, 2020, 8:46 PM IST

मुंबई - आजच्या कॅबिनेट बैठकीत मुंबईतील जे कोरोना हॉटस्पॉट आहेत. त्या भागावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यासंबंधी व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. विशेषत: धारावीतील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता करणे, कोरोनाबाधित आढळलेल्या ठिकाणाचे विलगीकरण करणे. या गोष्टीवर लक्ष देण्यात आले आहे. तसेच लॉकडाउनच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी या भागात रॅपिड अक्शन फोर्स लावणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री तथा धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी दिली.

वर्षा गायकवाड

गायकवाड म्हणाल्या, धारावितील वैद्यकीय तपासणीत वाढ करण्यात येणार आहे. रुग्णांचा मेडिकल रिपोर्ट लवकर मिळण्यासाठी यंत्रणा राबवली जात आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. मुंबईतल्या धारावी सारख्या झोपडपट्टीत देखील दहा रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. धारावी येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असल्यामुळे या ठिकाणी याचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे धारावीत मोठी दक्षता घ्यायला हवी, यासाठी आणि राज्यभर कोरोनाच्या परिस्थितीविषयी आणि इतर विषयांसाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक पार पडली.

बैठकीला मंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी राज्यात असलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत मुंबईतील मोठ्याप्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याठिकाणी कशाप्रकारे उपाययोजना करता येतील याविषयी चर्चा झाली. तसेच वर्षा गायकवाड यांनी धारावीविषयी कॅबिनेटमध्ये विविध विषय मांडून मंजूर करून घेतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.