ETV Bharat / state

एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 'तिचा' मृत्यू; मात्र आरोपी अद्याप मोकाटच

author img

By

Published : Aug 29, 2019, 11:44 PM IST

पीडित मृत तरुणी ७ जुलै रोजी आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली होती. त्यावेळी या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर ती ८ तारखेपासून आजारी होती. एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिचा काल औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.

आंदोलक

मुंबई - एका महिन्यांपूर्वी शहरातील चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या तरुणीचा काल रात्री औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मात्र, मृत तरुणीचे असे हाल करणारे आरोपी अद्यापही मोकाट आहेत. त्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप, मृत तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

१९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. तिचा मृत्यू झाला आहे, मात्र आरोपी अद्याप मोकाट आहे

मृत तरुणी ७ जुलै रोजी आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली होती. त्यावेळी या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर ती ८ तारखेपासून आजारी होती. एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिचा काल औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी गुन्हा पहिल्यांदा औरंगाबाद येथे नोंदविण्यात आला होता. त्यानंतर तो मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. मात्र, एक महिना उलटल्यानंतर देखील आरोपी अजूनही मोकाट आहेत. पोलिसांनी तपासात प्रगती केली नसल्याने या घटनेमुळे संतप्त झालेल्या चेंबूर, चुनाभट्टी परिसरातील नागरिकांनी आणि मृत तरुणीच्या नातेवाईकांनी आज चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला आहे.

आरोपी मोकाट असल्याने मृत तरुणीचे नातेवाईक संतापले

या प्रकरणात आरोपी अजून मोकाट असल्याने मृत तरुणीच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस आणि डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी सदरील तरुणी कॅटरिंगच्या व्यवसायात काम करायची, ७ जुलै रोजी अत्याचारामुळे घाबरलेल्या पीडितेने या घटनेची वाच्यता घरी केली नव्हती. यावर तिच्या वडिलांनी तिला गावातील रुग्णालयात दाखल केले होते.

मात्र, प्रकृती खालवल्याने तिला औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या तपासात तिला गुंगीचे औषधा बरोबरच ड्रग्जसुद्धा दिल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर तिच्यावर बलात्कार झाल्याचेही निष्पन्न झाले होते. यावर तिच्या वडिलांनी औरंगाबाद येथील पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा नोंदवला होता. मात्र आरोपींची माहिती देऊन सुद्धा पोलिसांनी आरोपीस पकडले नाही. उलट फिर्यादीलाच त्रास दिल्याचा आरोप, नातेवाईकांनी केला आहे

औरंगाबादच्या बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर तपासासाठी हे प्रकरण मुंबई येथे वर्ग करण्यात आले. त्यात तपास कामात चुनाभट्टी पोलिसांनी फिर्यादी यांनाच त्रास दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर आरोपीने त्या मुलीला केलेले कॉल आणि इतर पुरावे पोलिसांना देऊन देखील पोलिसांनी अजूनही आरोपीला अटक केले नाही. सदर गुन्ह्यातील दोषी आरोपींना तत्काळ अटक करा, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.

Intro:त्या मयत तरुणीच्या आरोपींना पोलिस पाठीशी घालत आहेत.नातेवाईकाचा चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

एक महिन्यांपूर्वी मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता.या तरुणीचा काल रात्री औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला मात्र आरोपी अजूनही मोकाट असून त्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप मयत तरुणीच्या नातेवाईकांनी करत आज चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.Body:त्या मयत तरुणीच्या आरोपींना पोलिस पाठीशी घालत आहेत.नातेवाईकाचा चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

एक महिन्यांपूर्वी मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता.या तरुणीचा काल रात्री औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला मात्र आरोपी अजूनही मोकाट असून त्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप मयत तरुणीच्या नातेवाईकांनी करत आज चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

पीडित मयत तरुणी 7 जुलै रोजी आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली त्यावेळी त्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला.आणि ती 8 तारखेपासून आजारी पडली आणि काल एक महिन्याच्या मृत्यूशी झुंज दिल्यानंतर औरंगाबाद च्या घाटी रुग्णालयात त्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .

प्रथम गुन्हा औरंगाबाद येथे नोंदवून तो मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला मात्र एक महिना उलटल्यानंतर देखील आरोपी अजूनही मोकाट आहे .पोलिसानी तपासात प्रगती केली नसल्याने या घटनेमुळे संतप्त झालेल्या चेंबूर, चुनाभट्टी परिसरातील नागरिकांनी आणि पीडित मयत तरुणीच्या नातेवाईकांनी आज चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला आहे.

या प्रकरणात आरोपी अजून मोकाट असल्याने या मृत तरुणीच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे.या मृत्यू व प्रकरणास पोलीस आणि डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ती तरुणी केटरिंग च्या व्यवसायात काम करायची ,७ जुलै रोजी अत्याचारामुळे घाबरलेल्या पीडितेने या घटनेची वाच्यता घरी केली नव्हती. यावर तिच्या वडिलांनी तिला गावातील रुग्णालयात दाखल केले तिची, प्रकृती खालवल्याने तिला औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांच्या तपासात तिच्यावर गुंगीचे औषध दिले असून ड्रग्ज ही दिल्याचे डॉक्टरांच्या अहवालात स्पष्ट झाले होते. तर तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे ही निष्पन्न झाले होते यावर तिच्या वडिलांनी औरंगाबाद येथील पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा नोंदवला मात्र आरोपीची माहिती देऊन सुद्धा पोलिसांनी आरोपीस पकडले नाही उलट फिर्यादीलाच त्रास दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे

पीडित तरुणीचा भाऊ

 औरंगाबाद च्या बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदवून औरंगाबाद येथु हा गुन्हा तपासा साठी मुंबई येथे वर्ग करण्यात आला, त्यात तपास कामात चुनाभट्टी पोलिसांनी फिर्यादी यांनाच त्रास दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे ,तर आरोपीने त्या मुलीला केलेले कॉल आणि इतर पुरावे पोलिसांना देऊन देखील पोलिसांनी अजूनही आरोपीला अटक करू शकले नाही ,तर जोवर आरोपीला अटक होणार नाही आणि त्या तरुणीला न्याय मिळवून देणारा असल्याचे आंदोलन करणाऱ्या समाजीक कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक आमदारांनी भेट देऊन सांगितले आहे ,

Byt पीडितेचा भाऊ
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.