ETV Bharat / state

येस बँक प्रकरण : राणा कपूरच्या ईडी कोठडीत पाच दिवसांची वाढ - येस बँक प्रकरण

येस बँकेचा माजी संस्थापक राणा कपूर यास ईडीकडून अटक केल्यानंतर 11 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आज पुन्हा त्याला ईडी न्यायालयात हजर केले होते. राणा चौकशीत सहकार्य करत नसल्याने कोठडीत पाच दिवसांची वाढ करत 16 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

राणा कपूर
राणा कपूर
author img

By

Published : Mar 11, 2020, 7:19 PM IST

Updated : Mar 11, 2020, 11:43 PM IST

मुंबई - हजारो कोटी रुपयांचा घोटाळ्यात अडकून आर्थिक डबघाईला आलेल्या येस बँकेचा माजी संस्थापक राणा कपूर यास ईडीकडून (सक्तवसुली संचालनालय) अटक केल्यानंतर आज पुन्हा ईडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीकडून पुन्हा एकदा राणा कपूर हा चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राणा कपूरच्या ईडी कोठडीत 16 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

राणा कपूरच्या ईडी कोठडीत पाच दिवसांची वाढ

ईडीच्या वकिलांनी आज न्यायालयात येस बँकेच्या घोटाळ्यात तब्बल 30 हजार कोटींची कर्ज देण्यात आल्याचे सांगितले आहे. या 30 हजार कोटींमध्ये 20 हजार कोटी हे बँकेच्या बुडीत कर्जात (एनपीए) गेले आहे. राणा कपूर व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने असलेल्या 78 कंपन्यांना हे 20 हजार कोटी दिले असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या बरोबरच उर्वरीत 10 हजार कोटी रुपये कुठे आहेत, याचाही तपास ईडीला करायचा असल्याने राणा कपूर यांच्या ईडी कोठडीची मागणी करण्यात आली होती.

ईडीच्या वकिलांच्या मागणीवर राणा कपूर यांच्या वकिलांनी राणा कपूर यांच्या ईडी कोठडीला विरोध करत म्हटले, ज्यावेळी येस बँक राणा कपूर यांनी सोडली होती. तेव्हा बँकेच बुडीत कर्ज (एनपीए) केवळ 1 टक्का होता. या नंतर बँकेच्या पदावरून पायउतार झाल्यानंतर 20 हजार कोटींच्या बुडीत कर्जाशी (एनपीए) राणा कपूर यांचे काहीही संबंध नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. येस बँकेच्या संदर्भात सीबीआय 7 मार्च गुन्हा नोंदवला आहे. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रकरणात कोणाला तरी जबाबदार धरले जाणार आहे, असे म्हटल्या होत्या. त्यानंतर 6 मार्च ईडीने छापा टाकला होता. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ईडी न्यायालयाने राणा कपूर यास 16 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, राणा कपूर यांच्या बँकेकडून कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या कंपनींना हजारो कोटी रुपये कर्ज देण्यात आले होते. यानंतर राणा कपूर यांच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या बँक खात्यात अचानक मोठ्या रकमा जमा करण्यात आल्या होत्या. यात राणा कपूर यांच्या पत्नीच्या बँक खात्यातही पैसे जमा झाले होते.

ईडी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राणा कपूर यांच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या बँक खात्यात 600 कोटीहून अधिक रक्कम जमा झाली होती. ही रक्कम डिएचएफएल सारख्या कर्ज बुडविणाऱ्या कंपनीकडून देण्यात आले होते. या प्रकरणी राणा कपूर यांची पत्नी बिंदू व तीन मुलींची सुद्धा चौकशी केली जात आहे.

हेही वाचा - येस बँक प्रकरण : नगरसेवकाच्या आक्षेपामुळे 'या' महानगरपालिकेचे वाचले 240 कोटी

Last Updated : Mar 11, 2020, 11:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.